IMPIMP

Pune Crime | बारा लाखांची फॉच्युनर 50 हजार देऊन घेऊन गेला; गाडी गेली वर कर्जाचे हप्ते थकविले, शेतकर्‍याची फसवणूक

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | फॉर्च्युनर ही अलिशान गाडीचा व्यवहार १२ लाख रुपयांमध्ये आरोपींनी केला. त्यातील १० लाखांचे कर्जाचे हप्ते भरण्याचे मान्य केले. व २ लाख रुपये रोख देण्याचे ठरले. असे असताना त्यापैकी फक्त ५० हजार रुपये रोख देऊन त्याने शेतकर्‍याकडून विश्वासाने गाडी ताब्यात घेतली. आता ना वरचे दीड लाख रुपये दिले ना गाडीचे हप्ते भरले. त्यामुळे एकीकडे गाडी तर गेली व कर्जाचे हप्ते भरण्याची वेळ शेतकर्‍यावर (Pune Crime) आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी आदेश सुरेश जाचक (वय ३९, रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात ( गु. र. नं. ८९५/२१) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संपत दत्तु खारतोडे, दत्तु खारतोडे (रा. खारतोडे वस्ती, पाटस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा प्रकार १२ जानेवारी २०१४ ते ७ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान घडला. आरोपी यांनी फिर्यादी यांची टोयोटा फॉर्च्युनर या गाडीचा व्यवहार १२ लाख रुपयांमध्ये ठरविला होता. गाडीचे कर्जाचे १० लाखांचे हप्ते भरण्याचे ठरवून व २ लाख रुपये रोख देण्याचे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रुपये रोख रक्कम त्यांनी दिली. (Pune Crime) फिर्यादीकडून त्यांनी गाडी ताब्यात घेतली.

त्यानंतर गाडीचे कर्जाचे हप्ते थकवले. तसेच उरलेले दीड लाख रुपये दिले नाही. तसेच गाडी परत न देता लपवून ठेवून त्यांची फसवणूक (Cheating) केली म्हणून गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime | Twelve lakh fortune teller took 50 thousand; Debt installments exhausted, farmer cheated

 

हे देखील वाचा :

PM-Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 10वा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी, आता 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; जाणून घ्या

IMPS | आरबीआयनं बदलला पैशांच्या व्यवहाराचा ‘हा’ नियम, आता 2 लाखाऐवजी 5 लाख रुपये करू शकता ‘ट्रान्सफर’; जाणून घ्या

Rupali Chakankar | आयकर विभागाच्या कारवाईचा हिशोब व्याजासकट चुकता केला जाईल, रुपाली चाकणकर यांचा ‘घणाघात’

 

Related Posts