IMPIMP

Pune Crime | 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Accused absconding for 3 years arrested by Samarth police

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online): Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी तीन वर्षांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपीला शुक्रवारी (दि.30) भवानी पेठेतून (Bhavani Peth) अटक (Pune Crime) केली आहे. आरोपी सध्या आपल्या कुटुंबासह हडपसर (Hadapsar) येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मेहबुब बाबू घोडके (वय-56 रा. न्यू म्हाडा बिल्डींग, वैदुवाडी, हडपसर मुळ रा. भवानी पेठ, रुपी बँक शेजारी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते.
त्यावळी पोलीस अंमलदार सुमित खुट्टे (Sumit Khutte) व निलेश साबळे (Nilesh Sable) यांना माहिती मिळाली की, खुनाच्या प्रयत्नातील तीन वर्षापासून फरार असलेला आरोपी भवानी पेठेत रिक्षात बसला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भवानी पेठेत सापळा रचला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता 2018 मध्ये त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी घोडके याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
तसेच पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तो सतत पत्ता बदलून राहत होता.

 

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 प्रियंका नारनवरे (Deputy Commissioner of
Police Priyanka Narnaware), सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (Assistant
Commissioner of Police Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे
(Senior Inspector of Police Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम
(Inspector of Police (Crime) Ulhas Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे,
पोलीस अंमलदार सुमित खुट्टे, निलेश साबळे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे,
सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, विठ्ठल चोरमले यांच्या पथकाने केली.

 

 

 

Web Title : Pune Crime | Accused absconding for 3 years arrested by Samarth police

 

हे देखील वाचा :

Pune Police | पुण्याच्या गुन्हे शाखेतील 6 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक ! पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR

Modi government | PM मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला; म्हणाले – ‘मागण्या मान्य होईपर्यंत जीएसटी भरु नका’

 

Related Posts