IMPIMP

Beed Crime | दुर्देवी ! मायलेकीचा विहीरीत बुडुून मृत्यु; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मिठ्ठी मारली होती

by nagesh
Beed Crime | Unfortunate! Mileki drowned in a well; Even after his death, Chimukali had hugged his mother

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन  – Beed Crime | विहिरीत पडलेल्या आपल्या दीड वर्षाच्या मुलीला वाचवायला धावून विहिरीत उडी घेतलेल्या आईचा तिच्या चिमुकलीसह मृत्यू (Died) झाला आहे. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील बानेगाव (Banegaon) येथे घडली. विशेष म्हणजे विहिरीतून पाण्याबाहेर काढल्यानंतर मुलगी आईच्या कुशीत आढळून आली. आईला घट्ट मिठी मारली होती. तर आईने चिमुकलीचा हात घट्ट धरला होता. या घटनेमुळे (Beed Crime) परिसरात हळहळ व्यक्त होतो आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी, आशा सुंदर जाधवर (वय 22 ) व कु.शांभवी सुंदर जाधवर (दीड वर्ष) अशी त्या मायलेकींची नावे आहेत. आशा जाधवर यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा. वडजी ता. वाशी जि. उस्मानबाद) यांच्याशी 3 वर्षांपूर्वी झाला होता. आशा जाधवर व सुंदर जाधवर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. कोरोनात पतीचं निधन झालं. नैराश्यात असलेल्या आशा जाधवर 2 दिवसांपूर्वी आपल्या मुलीसह माहेरी बानेगावला आल्या. गुरूवारी वडील बाहेरगावी गेले होते आणि आई शेतीच्या कामात गुंतल्या होती. सायंकाळच्या सुमारास आशा जाधवर यांनी मुलगी शांभवीला शेतात नेले.

 

यावेळी खेळता-खेळता शांभवी विहिरीजवळ गेली. तिचा तोल जात ती विहिरीत पडण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी आई धावत विहिरीजवळ गेली आणि आईचाच तोल गेल्याने दोघेही मायलेकी विहिरीत पडल्या. त्या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. गुरूवारी रात्री उशिरा मायलेकींचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. शवविच्छेदन करून शुक्रवारी सकाळी दोघी मायलेकींवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Beed Crime | Unfortunate! Mileki drowned in a well; Even after his death, Chimukali had hugged his mother

 

हे देखील वाचा :

Bhagatsingh Koshyari | … अन् राज्यपालांनी भर स्टेजवर महिलेचा मास्क खाली ओढला

Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून 6 ते 7 जणांकडून वॉचमनला बेदम मारहाण

Whatsapp Multi Device Support Feature | व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांसाठी मोठी खुशखबर ! ‘त्या’ फीचरची प्रतिक्षा संपली, जाणून घ्या

 

Related Posts