IMPIMP

Diet For Thyroid | तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर कधीही खाऊ नका हे 5 प्रकारचे पदार्थ, आजपासूनच त्यांच्यापासून राहा दूर…

by sachinsitapure
Diet For Thyroid

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल (Diet For Thyroid), तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. हे पदार्थ तुमची थायरॉईड स्थिती बिघडू शकतात आणि समस्या (Thyroid Problem) निर्माण करू शकतात. थायरॉईड ग्रंथी संबंधित समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतात. अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारतातील प्रत्येक 8 पैकी 1 स्त्रीला थायरॉईडची समस्या आहे. एकूणच, देशातील 42 दशलक्षाहून अधिक लोक या आजाराने त्रासलेले आहेत (Diet For Thyroid).

जाणून घेऊया त्या 5 पदार्थांबद्दल ज्यापासून थायरॉईडच्या रुग्णांनी कायमचे दूर राहावे.

· सोयाबीन (Soya) –

सोयाबीन थायरॉईडच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नये. कारण सोयाबीनमध्ये गॉइट्रोजन नावाचा घटक असतो, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीची मोठी हानी होते. हे गॉइट्रोजन थायरॉईड (Goitrogens Thyroid) संप्रेरकावर प्रतिक्रिया देऊन त्याला ब्लॉक करते, ज्यामुळे थायरॉईड योग्यरित्या कार्य करू शकत नाही. म्हणून, जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर, सोया दूध (Soya Milk), टोफू (Tofu) इत्यादी सर्व सोया आधारित गोष्टी तुमच्या आहारातून पूर्णपणे काढून टाकल्या पाहिजेत.

· कोबी (Cabbages) –

थायरॉईडसाठी कोबी (Cabbage), फ्लॉवर (Flower), ब्रोकोली (Broccoli) या भाज्या ज्यांना ब्रासिका व्हेजीज म्हणतात, त्या अजिबात खाऊ नयेत. या भाज्यांमध्ये थायरॉईड विरोधी (Anti-thyroid) संयुगे भरपूर प्रमाणात असतात. ज्यांना गोइट्रोजेन्स म्हणतात जे थायरॉईडच्या सामान्य कार्यामध्ये अडचण आणू शकतात. या भाज्यांच्या अतिसेवनाने थायरॉईड ग्रंथी वर दबाव (Pressure Of Thyroid Gland) पडतो, ज्यामुळे संप्रेरक स्रावात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे थायरॉईड (Thyroid), हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism) किंवा ग्रेव्हस रोग (Graves Disease) यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी या भाज्यांचे सेवन अजिबात करू नये.

· कॅफिन (Caffeine) –

कॅफिन मुळे थायरॉईड ग्रंथी मध्ये (Thyroid Gland) थायरॉईड संप्रेरक तयार होण्याच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हार्मोन्सची पातळी (Hormones Level) बिघडू शकते. त्यामुळे थायरॉईड रुग्णांनी (Thyroid Patient) कमीत कमी कॅफीन घ्यावे किंवा ते पूर्णपणे टाळावे.

· जंक फूड (Junk Food) –

थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांनी जंक फूड (Junk Food) म्हणजेच फास्ट फूडपासून पूर्णपणे दूर राहावे.
या प्रकारच्या अन्नामध्ये सहसा भरपूर चरबी (Fats), मीठ (Salts) आणि कॅलरीज (Calories) असतात.
हे थायरॉईडसाठी अजिबात चांगले नसते.

· प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (Preservative Foods) –

प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे नूडल्स, सॉस, केचप, जाम, मॅजिक मसाला इत्यादी प्रक्रिया केलेले पॅक असणारे
खाद्यपदार्थ थायरॉईडच्या रुग्णांसाठी अजिबात फायदेशीर नाहीत (Diet For Thyroid).

Related Posts