IMPIMP

Health Tips – Viral Fever | फ्लू, व्हायरल फिव्हर आणि न्यूमोनिया हे आहेत एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे, जाणून घ्या कसे ओळखायचे

by sachinsitapure
Health Tips – Viral Fever

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – थंडी येताच अनेक आजारांची रांग सुरू होते (Health Tips – Viral Fever). सर्दी पासून ते न्यूमोनिया पर्यंत अनेक आजार आपल्याला विळखा घालतात. आजकाल देशातील अनेक भागात फ्लू, विषाणूजन्य ताप (Viral Fever) आणि न्यूमोनियाचे रुग्ण वाढत आहेत. या ऋतूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणू सक्रिय होतात, त्यामुळे हे आजार वाढू लागतात (Health Tips – Viral Fever).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्लू, विषाणूजन्य ताप आणि न्यूमोनियामध्ये फक्त खोकला, सर्दी आणि ताप येतो. अशा वेळी या तिघांना ओळखण्यात अनेकांचा संभ्रम होतो. हे तिन्ही आजार आपण शक्य तितक्या लवकर ओळखले पाहिजे, कारण न्यूमोनियासारखे रोग धोकादायक आणि प्राणघातक असू शकतात. म्हणून जाणून घेऊया या तीन आजारांच्या लक्षणांमधील (Health Tips – Viral Fever).

न्यूमोनिया आणि फ्लूमध्ये काय फरक आहे? (Difference Between Flu And Pneumonia)

डॉक्टरांच्या मते, फ्लू (Flu) आणि न्यूमोनिया या लक्षणांमधील (Pneumonia Symptoms) सर्वात मोठा फरक श्वासोच्छवासाचा संबंधित आहे. फ्लूमध्ये श्वास घेण्यास त्रास होत नाही, परंतु न्यूमोनियामध्ये श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची (Oxygen Level In Body) कमतरता निर्माण होते.
फ्लू झाल्यास छातीत दुखण्याची समस्या नसते, पण न्यूमोनियामध्ये छातीत प्रचंड दुखते (Chest Pain In Pneumonia). खोकल्याबरोबर कफ देखील जास्त प्रमाणात होतो.
न्यूमोनिया झाल्यास थकवा, भूक न लागणे आणि घाम थंड प्रचंड येतो. मात्र फ्लू मध्ये (Flu Symptoms)
थंड घाम येत नाही.
फ्लू तीन-चार दिवसांत स्वतःच बरा होतो. परंतु बॅक्टेरियल न्यूमोनियामुळे रुग्णाची स्थिती बिघडू शकते
(Bacterial Pneumonia). वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांचा जीवही जाऊ शकतो.

न्यूमोनिया आणि विषाणूजन्य ताप यांच्यातील फरक (Difference Between Pneumonia And Viral Fever)

व्हायरलमुळे सौम्य ताप, श्वासोच्छवासाचा त्रास किंवा छातीत दुखत नाही.

व्हायरल ताप कोणालाही होऊ शकतो. निमोनियाची हा सर्वाधिक लहान मुले आणि वृद्धांमध्ये आढळतात.

न्यूमोनिया कमी वयाच्या लहान मुलांसाठी धोकादायक असू शकतो.

Related Posts