IMPIMP

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना अटक

by nagesh
Ahmednagar Hospital Fire | including medical officer Visakha Shinde four arrested in ahmednagar hospital fire case

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत (Ahmednagar Hospital Fire ) 11 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक (Arrest) केली आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी (Medical officer) व तिघा परिचारिकांचा (nurses) समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांना कालच आरोग्य विभागाने निलंबित (suspend) केले आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात (tofkhana police station) दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

वैद्यकीय अधिकारी Medical Officer विशाखा शिंदे (Visakha Shinde), परिचारिका सपना पठारे (Sapna Pathare), आस्मा शेख (Asma Sheikh) आणि चन्ना आनंत (Channa Anant) यांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर शेख आणि चन्ना यांची सेवा समाप्त (Service terminated) करण्याचा आदेश काल आरोग्य विभागाने दिला आहे.
त्यानंतर आज (मंगळवार) त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
मात्र त्यांच्यासोबत निलंबित करण्यात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (District Surgeon Dr. Sunil Pokhrana)
आणि अन्य एका वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे पिरचारिका संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या (Ahmednagar Hospital Fire) घटनेनंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर (Deputy Inspector General of Police Dr. B.G. Shekhar) यांनी कालच नगरला भेट देऊन सखोल चौकशी केली होती.
मधल्या काळात आरोग्य विभागाकडूनही मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली.
पोलिसांनी संकलित केलेल्या पुराव्यात नावे निष्पन्न झाल्याने आज सायंकाळी यातील चार जणांना अटक केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या देखरेखीखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) तपास करीत आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले होते. त्याची पडताळणी तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब, मृत आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले.
यातून नावे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title : Ahmednagar Hospital Fire | including medical officer Visakha Shinde four arrested in ahmednagar hospital fire case

 

हे देखील वाचा :

Pune News | राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी मंजूर – हेमंत रासने

Pune News | पथारी व्यावसायिकांचे लॉकडाउनमधील शुल्क होणार माफ – हेमंत रासने

Nawab Malik | दाऊदची जमीन सनातन संस्थेनं खरेदी केली?; नवाब मलिकांच्या आरोपावरून सनातन संस्थेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

 

Related Posts