IMPIMP

Bhavani Peth Pune Crime News | पुणे : भांडणाच्या रागातून मामाकडून भाच्यावर सपासप वार, आरोपीला अटक

by sachinsitapure

पुणे : – Bhavani Peth Pune Crime News | वडिलांना मारल्याच्या राग मनात धरुन मामाने भाच्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) रात्री बाराच्या सुमारास भवानी पेठेतील मटण मार्केट जवळ घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) आरोपी मामावर सुधारित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Attempt To Murder)

याबाबत जखमी ओमकार प्रविण मिसाळ (वय-20 रा. तळजाई वसाहत, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार प्रसाद उर्फ लखन धनराज आरणे (वय-30 रा. भवानी पेठ, आण्णाभाऊ साठे वसाहत, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता 109(1) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Attempt To Kill)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांचा चुलत मामा आहे. मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास फिर्यादी ओमकार हे त्यांचे चुलत मामा व चुलत आजोबा यांच्या सोबत मटण मार्केटजवळील किराणा दुकानासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्य़ादी यांचा चुलत मामा प्रसाद आरणे हा त्याठिकाणी आला. त्याने मागच्या भांडणाचा राग मनात धरुन तु माझ्या वडिलांना का मारले असे बोलून कमरेतुन चाकू काढला.

आरोपीने फिर्यादी यांच्या पाठीमागे डाव्या बाजूला खांद्याजवळ चाकूने सपासप 4 ते 5 वेळा खुपसून डोक्यात वार केला. तुला आता संपवुन टाकतो असे बोलून गळ्यावर वार केला. त्यावेळी फिर्यादी हात मध्ये घातला असता त्यांच्या हाताच्या करंगळीजवळ व मनगटावर गंभीर दुखापात झाली. आरोपीने फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts