IMPIMP

Doctor Cut Off Her Boyfriends Private Part | लग्नाला विरोध केल्याने डॉक्टर प्रेयसीने प्रियकराचं कापले गुप्तांग; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

by sachinsitapure

बिहार: दोन वर्षे प्रेमसंबंधात राहून लग्नाला विरोध केल्याने डॉक्टर असलेल्या प्रेयसीने आपल्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याची घटना समोर आलेली आहे. ही घटना बिहार मधील छपरा जिल्ह्यातील आहे. येथील एका महिला डॉक्टरने प्रियकर असलेल्या नगरसेवकाचे गुप्तांग कापून त्याला जखमी केले. संबंधित महिला डॉक्टरने व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.

‘आयुष्यभर तो आता इतर कोणत्याही मुलीचे आयुष्य खराब करणार नाही’, असे तिने व्हिडिओत म्हंटले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रक्तस्त्राव होताच घाबरलेल्या तरुणीने इतरत्र फोन करून मदत मागितली. मग प्राथमिक उपचारानंतर पोलिसांनी त्या नगरसेवकाला जवळच्या रुग्णालयात नेले. त्याची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या कालावधीपासून लग्नाला विरोध केल्याने महिला डॉक्टर संतापली होती. ती नेहमी चीडचीड करत असे. अशातच तिने ही धक्कादायक घटना घडवून आणली. तिने स्वतः फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. जेव्हा पोलीस खोलीत आले तेव्हा सर्वत्र रक्त दिसले. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून त्याने शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. मात्र, सातत्याने लग्नासाठी टाळत असल्याने महिला संतापली होती.

दरम्यान, आरोपी महिला डॉक्टरचे नाव अभिलाषा आहे. तिचे स्थानिक वार्ड नंबर १२ येथील नगरसेवकाशी प्रेमसंबंध होते. नगरसेवक प्रकाश गुप्ताने लग्न करण्यास विरोध केल्याने तिने त्याचे गुप्तांग कापले. डॉक्टर अभिलाषाने तिच्या प्रियकराच्या प्रेमात वासनेपेक्षा काहीही नसल्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत त्याला अशी शिक्षा देण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही तिने सांगितले.

Related Posts