IMPIMP

Hinjewadi Police Raid On Gambling Den | पिंपरी : जुगार अड्ड्यावर हिंजवडी पोलिसांचा छापा, 5 जणांना अटक

by sachinsitapure

पिंपरी : – Hinjewadi Police Raid On Gambling Den | हिंजवडी फेज तीन येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. आरोपी ऑनलाइन वेबसाईटवर जुगार खेळत असताना हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 29 जून रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मेगा पोलीस मायस्टीक येथील फ्लॅट नं. 1604 येथे हि कारवाई केली.

अनुराग अगरदास बंजारे Anurag Agardas Banjare (वय-20 रा मेगा पोलीस मायस्टीक, डि विंग, फ्लॅट नं. 1604 फेज -3, मुळ रा. ठेठवारपारा, छावणी भिलाई छत्तीसगड), धनंजय विश्वेश्वर पाल Dhananjay Vishweshwar Pal (वय-24 रा. मेगा पोलीस मायस्टीक, फेज -3, मुळ रा. रहथुआ, ब्रह्मपुर बक्सर, बिहार), नवीन संजय गजभिये New Sanjay Gajbhiye (वय-20 रा. हिंजवडी मुळ रा. फौजीनगर, घाशीदास नगर, भिलाई दुर्ग, छत्तीसगड), अमोस ओस्कर मिंज Amos Oscar Minz (वय-19 रा. हिंजवडी, मुळ रा. चराई टोका, पत्थरगाव, जशपुर, छत्तीसगड), राहुल मदनसिंह कुमार Rahul Madan Singh Kumar (वय-21 रा. हिंजवडी मुळ रा. मु.पो. रहथुआ, रघुनाथपुर, बक्सर, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जुगार अड्डा चालवणारा अविनाश वर्मा हा फरार झाला आहे. याबाबत पोलीस हवालदार राजाराम गोकुळदास सराटे (वय-47) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 420, 464, 465, 468 सह महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज-3 येथील मेगा पोलीस मायस्टीक मधील डि विंग फ्लॅट 1604 येथे ऑनलाइन जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने याठिकाणी छापा टाकला असता आरोपी अविनाश वर्मा याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जुगार खेळण्यासाठी एक ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध करुन दिली होती. या वेबसाईटवर ऑनलाइन वेगवेगळ्या प्रकरारच्या खेळांवर पैसे लावले जातात. पथकाने छापा टाकला त्यावेळी आरोपी ऑनलाइन जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी अविनाश वर्मा पळून गेला. या कारवाईत 10 मोबाईल एक लॅपटॉप असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास एपीआय राम गोमारे करीत आहेत.

Related Posts