IMPIMP

Kondhwa Pune Crime News | किरकोळ कारणावरुन महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला धमकी, कोंढवा परिसरातील घटना

by sachinsitapure

पुणे :- Kondhwa Pune Crime News | मुलीकडून झाडाची कुंडी पडल्यामुळे तिला समज देण्यासाठी गेलेल्या महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका 45 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 24 जून रोजी उंड्री (Undri) परिसरात घडला आहे. याबाबत 42 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी सुनिल प्रकाश तलरेजा Sunil Prakash Talreja (वय-45 रा. कडनगर उंड्री, पुणे) याच्या विरुद्ध आयपीसी 509, 352, 506, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांच्या घरासमोर असलेली झाडाची कुंडी आरोपीच्या मुलीने पाडली. त्यामुळे तिला समज देण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करुन अंगावर धाऊन गेला. तसेच फिर्यादी यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी देऊन पतीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

धक्काबुक्की करुन महिलेचा विनयभंग

पुणे : घरातील बेडवर आराम करत असताना एका तरुणाने खिडकीतून घरात डोकावून पाहिले. याचा जाब विचारला असता तरुणाने महिलेला धक्काबुक्की करुन विनयभंग केला. हा प्रकार शुक्रवारी (दि.28) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम राजु पाटील Shubham Raju Patil (वय-24 रा. भवानी पेठ) याच्यावर मारहाण आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे (Molestation Case). आरोपीने मारहाण करुन पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts