IMPIMP

Kondhwa Pune Crime News | पुणे: दारुच्या नशेत पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधम बापावर FIR

by sachinsitapure

पुणे :  – Kondhwa Pune Crime News | साडेचार वर्षाच्या मुलीला क्रूर वागणूक दिल्याची घटना ताजी असतानाच दारुच्या नशेत 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रील 2023 ते 28 मे 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत 13 वर्षाच्या पिडीत मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 40 वर्षीय नराधम बापावर आयपीसी 376/2/एन, 354(अ), 323, 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीला दारुचे व्यसन असून तो दुपारच्या वेळी कामावरुन येताना दारु पिऊन येत होता.

पिडीत मुलीची आई आणि भाऊ घरी नसल्याचा फायदा घेऊन आरोपी जेवण करण्यासाठी घरी येऊन मुलीसोबत अश्लील चाळे करत होता. मुलीने विरोध केला असता त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तुला आणि आईला मारुन टाकण्याची धमकी दिली पिडीतेला दिली. यामुळे घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाकडे वाच्यता केली नाही. त्यानंतर आरोपी वारंवार पिडीत मुलीसोबत अश्लील चाळे करत होता. दरम्यान, आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. मुलीने त्याला विरोध केला असता आरोपीने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पिडीत मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन नराधम बाप विरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts