IMPIMP

Kondhwa Pune Crime News | पुणे: पोलीस स्टेशनला गेली तरी मला फरक पडत नाही, अत्याचार करुन महिलेला धमकी

by sachinsitapure

पुणे :  – Kondhwa Pune Crime News | महिलेला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच माझ्या खुप ओळखी आहेत, तू पोलीस स्टेशनला गेली तरी मला काय फरक पडत नाही असे म्हणून महिलेला धमकी दिली. तर आरोपीच्या ओळखीच्या महिलेने बघून घेण्याची धमकी पीडित महिलेला दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2023 ते मे 2024 या कालावधीत खडकवासला (Khadakwasla) व कोंढवा येथील निर्जन रस्त्यावर कारमध्ये घडला आहे.

याबाबत 35 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिप्तेश पुजारी (वय-30 रा. वडगाव धायरी) व 30 वर्षीय महिला यांच्याविरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून खडकवासला परिसरात फिरायला नेले. त्याठिकाणी एका लॉजवर नेऊन महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. महिलेने त्याला विरोध केला असता तू पोलीस स्टेशनला गेलीस तरी मला काही फरक पडत नाही, मी कोणाला घाबरत नाही, माझ्या खुप ओळखी आहेत, मी तुला बघून घेईन अशी धमकी दिली. तर आरोपीच्या ओळखीच्या महिलेने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

पाठलाग करुन महिलेचा विनयभंग

हडपसर : मुलीसोबत दुचाकीवरुन जात असताना महिलेचा पाठलाग करुन अश्लील भाष्य करत शिवीगाळ केली (Molestation Case). तसेच महिलेचा फोटो काढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार बुधवारी (दि.3) दुपारी पावणे एकच्या सुमारास हडपसर भागातील गोसावी वस्ती (Gosavi Vasti Hadapsar) परिसरातील रेल्वे पटरी जवळ घडला. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश साळुंखे (वय-34 रा. वैदवाडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts