IMPIMP

Koregaon Park Pune Crime News | पुणे: कंपनी मालकाकडून महिला मॅनेजरसोबत असभ्य वर्तन, कोरेगाव पार्क मधील घटना

by sachinsitapure

पुणे : – Koregaon Park Pune Crime News | रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला मॅनेजर सोबत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्यासोबत असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात आणि कंपनीच्या बाहेर 5 मार्च पासून 3 जून पर्यंत वेळोवेळी घडला आहे. (Molestation Case)

याबाबत 26 वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मुकेश नयनमल कलानी Mukesh Nayanmal Kalani (रा. शहनशाह सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश कलानी याची कोरेगाव पार्क परिसरात रिटेल कंपनी आहे. या कंपनीत पिडित महिला सिनियर कॉर्पोरेट मॅनेजर या पदावर काम करते. आरोपीने फिर्यादी यांना वारंवार संपर्क साधून त्यांच्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने फिर्यादी या राहत असलेल्या पत्त्यावर भेट वस्तू पाठवल्या. तसेच त्या जीममध्ये जात असताना व तिथून घरी परत जात असताना आरोपीने सतत पाठलाग केला. तसेच ऑफिसच्या कामानिमित्त केबीनमध्ये बोलवून अश्लील स्पर्श करुन जवळीक साधून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी यांना संपर्कात व वेळोवेळी भेटत जा, नाहीतर माझ्याकडे असलेले पार्टीचे व तुझ्यासोबतचे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts