IMPIMP

Mundhwa Pune Police | जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना मुंढवा पोलिसांकडून अटक (Video)

by sachinsitapure

पुणे :  – Mundhwa Pune Police | रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळातील सोन्याचे दोन लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांनी नाशिक व जळगाव येथून अटक केली आहे. ही घटना 9 एप्रिल रोजी बी.टी. कवडे रोड, घोरपडी गाव येथे घडली होती. याबाबत माधवी श्रीनिवास गंपा (वय-38 रा. बीटी कवडे रोड, पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Arrest In Robbery Case)

दाखल गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकाने घटनास्थळाच्या आजू-बाजूच्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करीत आहेत. पोलीस पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींची माहिती मिळवली. पोलिसांच्या पथकाने नाशिक व जळगाव येथून दोन आरोपींना अटक करुन गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम, सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, हेमंत पेरणे, सचिन पाटील, स्वप्निल रासकर, किरण बनसोडे यांच्या पथकाने केली.

Cheating Fraud Case Pune | पुणे : ऑनलाइन कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी गजाआड

Related Posts