IMPIMP

Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी, निगडी परिसरात दहशत पसरविणाऱ्या पवार, जाधव टोळीवर ‘मोक्का’

by sachinsitapure

पिंपरी :  – Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी पोलीस ठाण्याच्या (Pimpri Police Station) हद्दीतील अविनाश पवार (Avinash Pawar Gang) आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जितेंद्र जाधव (Jitendra Jadhav Gang) टोळीवर ‘मोक्का’ लावण्यात आला. शहरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांच्याकडून गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 18 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 98 गुन्हेगारांवर ‘मोक्का’ लावण्यात आला.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी टोळी प्रमुख अविनाश राकेश पवार (वय-28), संतोष उत्तम चौगुले (वय-30), ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेंद्र पाटील (वय-27), यश बाबू गरुड (वय-18), निसार मोहम्मद शेख (वय-25), रेणुका मारुती पवार (वय-36 सर्व रा. दत्तनगर, चिंचवड), रंजना उत्तम चौगुले (वय-52 रा. मोहननगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 302, 143, 147, 149 गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख जितेंद्र आनंदा जाधव (वय-23), आकाश उर्फ बबुल दत्ता मोरे (वय-19), अमन समिर शेख (सर्व रा. ओटास्किम, निगडी, पुणे), अल्पवयीन मुलाविरुद्ध आयपीसी 307, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारावर सात गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांनी पिंपरी, वाकड, चिखली, निगडी, रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, गंभीर दुखापत, कट रचणे, तोडफोड, विनयभंग, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे, असे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्काअतंर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कागदपत्रांची छाननी करून ‘मोक्का’ कारवाईचे आदेश अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी पारित केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पी.सी.बी. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस अंमलदार सोनटक्के, ओंकार बंड, कौटेकर, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली.

Related Posts