IMPIMP

PM Kisan App Link Fraud | सावधान! WhatsApp वर पीएम किसान ॲप ची लिंक; शेतकऱ्यांचे सात लाख रुपये लंपास

by sachinsitapure

हिंगोली : PM Kisan App Link Fraud | शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता नुकताच डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला आहे. तसेच १८ व्या हप्त्याची यादी देखील पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आता प्रकाशित करण्यात आली आहे. याच दरम्यान हिंगोलीतील पाच शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

व्हॉट्सॲप वर त्यांना पीएम किसान ॲप ची लिंक पाठवून त्यांच्या खात्यातून एकूण सात लाख रुपये काढून घेण्यात आले आहेत. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावमध्ये पीएम किसान ॲप ची लिंक पाठवून सायबर भामट्यांनी पाच शेतकऱ्यांच्या खात्यातील सात लाख रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

बँकेत असलेल्या खात्यातून अचानक पैसे डेबिट होत असल्याचे मॅसेज आल्यांनतर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी तातडीने हिंगोलीच्या पोलीस मुख्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. दरम्यान हिंगोली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरु केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Related Posts