IMPIMP

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime Branch | सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे (Pistol Seized). ही कारवाई सोमवारी (दि.20) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास डीपी रोड येथील बोगन व्हिला फार्मच्या मोकळ्या मैदानात केली.

रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय-27 रा. दारुवाला पुल, सोमवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. युनिट तीनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अंलकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार दुध्या चव्हाण बोगन व्हिला फार्मच्या मोकळ्या मैदानातील झाडाखाली थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली घेऊन दोन देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार राऊंड व एक मोपेड असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, पिस्टल बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतोष क्षीरसागर, शरद वाकसे, पांडूरंग कामतकर, किरण पवार, संजीव कळंबे, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, सोनम नेवसे, कानिफनाथ कारखेले, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.

PMC Notice To Bajaj Allianz House | अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजाज अलियान्झ हाऊसला पुणे महापालिकेची नोटीस

Related Posts