IMPIMP

Pune Crime Court News | पुणे: अपहरण व पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

by sachinsitapure
Pune Court

पुणे :  – Pune Crime Court News | अपहरण व पोक्सोच्या गुन्ह्यातील (POCSO Act) आरोपीला विशेष न्यायालयाचे (पोक्सो) न्यायाधीश एस.आर. साळुंखे (Judge S.R. Salunkhe) यांनी जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी दिली. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात मे 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Bail In Kidnapping Case)

पीडित मुलगी नीट परीक्षेच्या (NEET Exam) तयारीसाठी आली होती. ती होस्टेलमध्ये राहत होती. या वसतीगृहाच्या केअरटेकरने पिडित बेपत्ता असल्याची व तिला पळून जाण्यासाठी प्रवृत्त केल्याबाबतची तक्रार 14 मे 2024 रोजी स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली होती. यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी 363 व 354 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहेत. पोलिसांनी पिडितेचा शोध घेतला घेतला असता पिडित मुलगी तक्रारदार याच्याकडे आढळून आली. तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिला पळून जाण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली.

आरोपीच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, तक्रारदार व पिडित यांचे बालपणापासून एकमेकांवर प्रेम होते व त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पिडिताच्या आई-वडिलांचा त्यास विरोध होता. पिडित मुलगी ही समजूतदार वयाची असून फक्त त्यांचे प्रेम संबंध असल्यामुळे स्वत:च्या इच्छेने पळून गेली होती. प्रथम माहिती अहवाल व गुन्ह्याचे स्वरूप बघता कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा ही सात वर्षांपेक्षा जास्त नसून यामध्ये आरोपीला कोठडीत ठेवण्याची काहीही गरज नाही व आरोपीस जामीनावर सोडण्यात यावे, आरोपी न्यायालयाच्या सर्व आदेशांचे पालन करेल.

विशेष न्यायालयासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्याचा विचार करता व सदरील आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सिद्धांत मालेगांवकर यांनी केलेल्या युक्तिवाद मान्य करुन आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपीच्या वतीने ‘मालेगावकर अँड असोसिएटस्’ तर्फे अ‍ॅड. सिद्धांत मालेगावकर यांनी कामकाज पाहिले. तसेच अ‍ॅड. कुणाल पगार (Adv Kunal Pagar), अ‍ॅड. प्रेरणा बावीस्कर (Adv Prerana Baviskar), अ‍ॅड. प्रमोद धुळे (Adv Pramod Dhule), अ‍ॅड. आकाश मायने (Adv Aakash Mayane), अमोल घावटे (Amol Ghavte) यांनी कामकाज पाहिले.

Related Posts