IMPIMP

Pune Crime News | पिंपरी: संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सोनसाखळी चोरणारा गजाआड

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Crime News | संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात (sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2024) लाखो वारकरी सहभागी झाले आहेत (Warkari In Pune). पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.30) सकाळी आंबा स्टॉप, अलंकापरुम चौक व देहू फाटा, आळंदी येथे करण्यात आली आहे. (Chain Snatching In Palkhi Sohala)

भगवान वसंत गायकवाड (वय-30 रा. खडकपुरा, ता.जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत तुषार विश्वनाथ काकडे (वय-44 रा. अलंकापुरम सोसायटी, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. (Chain Snatcher Arrested In Palkhi Sohala)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने रविवारी सकाळी पुण्याच्या दिशेने प्रस्थान केले. या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. तसेच ठिकठिकाणी पालखीचे दर्शन करण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत असतात. फिर्यादी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अलंकापुरम चौकात आले होते. दर्शन घेत असताना आरोपीने गर्दीचा फायदा घेऊन काकडे यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावली.

त्यानंतर देहू फाटा, आळंदी समिर अनिलराव चंदुरवार (वय-45) यांची 39 हजार रुपये किमतीची 13 ग्रॅम वजनाची सोन्याची सोनसाखळी हिसका मारुन चोरली. आरोपीने दोन घटनांमध्ये 23 ग्रॅम वजनाचे एकूण 69 हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या चोरल्या. याबाबत तुषार काकडे यांनी फिर्याद दिल्यानंतर दिघी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Related Posts