IMPIMP

Pune Crime News | पुणे : जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, तडीपार गुन्हेगाराला अटक

by sachinsitapure

पुणे :  – Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली (Marhan). तसेच तरुणाच्या डोक्यात कोयत्याने (Koyta Attack) वार करुन गंभीर जखमी केले (Attempt To Kill). हा प्रकार शनिवारी (दि.18) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लोहियानगर (Lohiya Nagar) येथे घडला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police Station) एका तडीपार गुन्हेगाराला अटक केली आहे.

याबाबत जखमी आयान उर्फ निझाम यासीन शेख (वय-19 रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ, पुणे) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जुबेर उर्फ वड्डी मुस्तफा शेख (वय-23 रा. लोहियानगर, पुणे) व त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन साथीदारावर आयपसी 307, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जुबेर शेख हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खडक, समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट, मारहाण, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला 16 जून 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. याचा राग आरोपी जुबेर शेख याच्या मनात होता. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी गल्लीतून जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. अयान शेख याला जीवे मारण्याच्या उद्देशाने जुबेर याच्या अल्पवयीन साथीदाराने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तर जुबेर याने ‘याच्या मानेवर वार करून खल्लास कर’ असे म्हणून दगडाने मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 13 वर्षाच्या मुलावर चाकूने वार, एकाला अटक

Related Posts