IMPIMP

Pune Crime News | सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! पालघन घेऊन पसरत होते दहशत, सराईत गुंडांसह 5 जणांना अटक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Wanwadi Police Station - Attempted murder due to immoral relationship

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | भर रस्त्यात लोकांवर कोयत्याने वार करुन दहशत पसरविणार्‍यांना पोलिसांनी पाठलाग करुन जागेवरच गुंडांना धुतल्याचा प्रकार घडला होता. त्याच परिसरात पुन्हा एकदा टोळक्याने कोयते, पालघन घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून कोयते टाकून त्यांनी पलायन केले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) दोघा गुंडांसह ५ जणांना अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विकास जितेंद्र चावडा Vikas Jitendra Chavda (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, मोहन धर्मा राठोड Mohan Dharma Rathod (वय २१), संग्राम ज्ञानदेव शिरसाठ Sangram Gnandeva Shirsath (वय २१), अर्जुन मनोहर शिंदे Arjun Manohar Shinde (वय २०), आदित्य चंद्रकांत आदमाने Aditya Chandrakant Admane (वय २०, सर्व रा. वडगाव बुद्रुक – Vadgaon Budruk) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास चावडा व मोहन राठोड हे रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals On Police Records) आहेत. (Pune Crime News)

 

याबाबत पोलीस नाईक अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २७७/२३) दिली आहे. हा प्रकार सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील (Sinhgad College Campus) सिंहगड इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कॉलेजच्या (Sinhgad Institute of Management) पाठीमागे असलेल्या पार्किंगच्या जागेमध्ये शुक्रवारी पहाटे २ वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड इन्स्टिट्युट मॅनेजमेंट कॉलेजच्या मागे पार्किंगच्या जागेमध्ये
तीन दुचाकीवरुन ६ जण आले होते. त्यांच्या हातात कोयते, पालघन अशी शस्त्रे होती.
शस्त्राचा धाक दाखवून ते दहशत पसरवत होते. याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला
(Pune Police Control Room) मिळाली. गस्तीवरील मार्शल तातडीने तेथे पोहचले.
पोलिस आल्याचे पहाताच हे टोळके हातातील शस्त्रे व मोटारसायकली तेथेच टाकून मिळेलच्या दिशेला पळून गेले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले होते.
पोलिसांनी त्यांच्यातील ५ जणांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Pune Crime News | Pune Criminals Terror In Sinhagad College Area Again! Bharti Vidyapeeth Police Arrest 5

 

हे देखील वाचा :

Pune Crime Fire News | वाघोलीतील मंडप साहित्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 3 कामगारांचा होरपळून मृत्यु़

IPS Nilesh Ashtekar | आयपीएस निलेश अष्टेकर यांच्याविरूध्द पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल, शरीर सुखाची मागणी केल्याचा विधवा महिलेचा दावा

Pune Crime News | मोक्कातील आरोपी मित्राच्या जामिनाच्या पैशासाठी दान पेट्या फोडून चोरी करणार्‍यांना कोंढवा पोलिसांकडून अटक

 

Related Posts