IMPIMP

Pune Crime News | पुणे: विवाहितेचा पाठलाग करुन संबंध ठेवण्याची मागणी, तरुणावर FIR

by sachinsitapure

पुणे : – Pune Crime News | विवाहित महिलेला सतत फोन करुन तिचा पाठलाग केला. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याकडे संबंध ठेवण्याची मागणी केली. संबंध ठेवण्यास नकार दिल्यास स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि.30) रात्री आठच्या सुमारास विश्रामबाग परिसरात घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) 24 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 36 वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत सुनील वाघमारे Prashant Sunil Waghmare (वय-24 रा. रामकृष्ण मंगल कार्यालय, पेरुच्या बागेजवळ, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध आयपीसी 354(ड), 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने फिर्यादी महिलेच्या मोबाइलवर सतत फोन करुन शिवीगाळ केली. तसेच महिलेचा पाठलाग करुन घरी येऊन संबंध ठेवण्याची मागणी करुन त्रास दिला. आरोपीने महिलेबाबत चौकशी करु लागला.

दरम्यान, फिर्य़ादी यांच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने त्या मुलांना घेऊन परगावी गेल्या होत्या. लग्नसमारंभ झाल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या मुलांना भाचीसोबत पुण्यात पाठवून दिले. रविवारी रात्री फिर्यादी यांची भाची व मुलगा घराच्या खाली भाजी आणण्यासाठी गेले असता मुलगी घरामध्ये एकटीच होती. आरोपीने फिर्यादी यांच्या घरी येऊन मुलीकडे फिर्य़ादी यांच्याबाबत चौकशी करुन जोरजोरात शिवीगाळ केली. तुझ्या आईने माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर मी तीच्या नावाची चिठ्ठी लिहुन माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts