IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! व्याजाच्या पैशासाठी सावकाराने केली शरीर सुखाची मागणी, बंदूकीच्या धाकावर केला बलात्कार

by nagesh
pune crime | rape case in talegaon dabhade

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) व्याजाने घेतलेल्या पैशांच्या व्याजाच्या मोबदल्यात पुण्यातील (Pune Crime) एका 26 वर्षीय महिलेकडे शारिर सुखाची मागणी केली. महिलेने नकार देताच खासगी सावकाराने (moneylender) बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार मागील पाच महिन्यापसून सुरु होता. आरोपीने दिल्ली, पठाणकोठ, अमृतसर, सुरत अशा विविध ठिकाणी अत्याचार केला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) दोघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायदा (Maharashtra Money-Lending (Regulation) act), आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) आणि बलात्काराचा (rape) गुन्हा दाखल करुन अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

खासगी सावकार किरण रंभाजी घारे (वय-40 रा. बेबडओहळ ता. मावळ), दिपक प्रकाशचंद्र ओसवाल (वय-46 रा. शांतीनाथ सोसायटी, वतन नगर, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल
करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार करुन त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार अत्याचार केला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ओसवाल याच्या ओळखीची होती.
त्यानेच घारे याच्याशी पीडितेशी ओळख करुन दिली होती.
दरम्यान, पीडितेने घारे याच्याकडून एक लाख रुपये व्याजानं घेतले होते.
काही दिवसांनी पीडितेनं 50 हजार रुपयांचे दोन चेक आरोपी घारेला दिले.
परंतु आरोपीने व्याजाच्या पैशांच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी (demand physical relation) केली. परंतु पीडित महिलेने याला नकार दिला.

 

यानंतर आरोपीनं महिलेच्या पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी दिली.
तसेच बंदुकीचा धाक दाखवत पीडितेला फॉरच्यूनर (Fortuner) गाडीत बसवलं.
त्यानंतर आरोपीने महिलेला दिल्ली, पठाणकोट, अमृतसर आणि सुरत अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करुन तिला ब्लॅकमेल (Blackmail) करत पीडितेवर वारंवार अत्याचार केले.
तसेच कोठेही तक्रार केली तर माझं कुणी वाकडं करु शकत नाही, अशी धमकी दिली.
आरोपीने मार्च ते ऑगस्ट पर्यंत पीडितेवर वारंवार अत्याचार केला आहे.
पीडितीने आरोपीच्या सततच्या त्रासाला वैतागून पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | rape case in talegaon dabhade

 

हे देखील वाचा :

Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Police | हद्दीत अवैध धंदे सुरु असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरणार

 

Related Posts