IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन खून, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून 7 आरोपींना अटक

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन सोमवारी (दि.1) सायंकाळी सातच्या सुमारास खेड तालुक्यातील खालुंब्रे गावच्या हद्दीत एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार (Koyta Attack) करुन खून केल्याची घटना घडली होती (Murder In Khed). याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील (Mahalunge MIDC Police Station) तपास पथकाने 48 तासात सात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई मावळ तालुक्यातील जांबवडे येथे करण्यात आली.

गणेश अनिल उर्फ आण्णा तुळवे (वय-30 रा. खालुंब्रे, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयूर अशोक पवार (वय 30, रा. समता कॉलनी, तळेगाव दाभाडे), विशाल पांडुरंग तुळवे (वय 37), रणजीत बाळू ओव्हाळ (वय 22), प्रथम सुरेश दिवे (वय 21), विकास पांडुरंग तुळवे (वय 35), सनी रामदास तुळवे (वय 26), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय 38, सर्व रा. खालुंब्रे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत गणेश याचा भाचा प्रणय प्रदिप ओव्‍हाळ (वय 21, रा. कान्‍हे फाटा, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रणय आणि त्‍याचा मामा गणेश हे सोमवारी सांयकाळी सात वाजताच्‍या सुमारास दुचाकीवरून खालुंब्रे गावच्या दिशेने चालले होते. त्यावेळी गणेश पाठीमागे बसला होता. तळेगाव-चाकण रस्‍त्‍यावरील खालुंब्रे गावच्‍या हद्‌दीत हैद्राबादी बिर्याणी हाऊस समोर आले असता आरोपी पाठीमागून दुचाकीवरून आले. त्‍यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन गणेश याच्‍यावर कोयत्‍याने डोक्यात वार करुन खून केला. फियादी प्रणय हा सोडविण्‍यासाठी आला असता आरोपींनी त्‍याच्‍यावरही वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन सनी तुळवे व चंद्रकांत तुळवे यांना ताब्यात घेतले. तर इतर आरोपी फरार झाले. फरार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी मावळ तालुक्यातील जांबवडे येथे एका घरात लपून बसल्याची माहिती पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे यांना समजली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. खून झाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 48 तासात आरोपींचा शोध घेऊन सात जणांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलाश कुथे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, अमोल बोराटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर यांच्या पथकाने केली

Related Posts