IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तंबाखू दिली नाही म्हणून टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | दीड महिन्यापूर्वी तंबाखू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तेरे को खल्लास करता हुं’ असे म्हणत कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथे घडली आहे (Koyta Attack) . याप्रकरणी सांगवी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Kill)

कृष्णाकुमार उपेंद्र पासवान (वय-21 रा. विनायक नगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शुभम मानमोडे (रा. पिंपळे निलख, पुणे), संकेत थोरात (रा. वाकड) व त्यांच्या अनोळखी मित्रावर 307, 341, 324, 323, 504, 427, 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी शुभम याने दीड महिन्यापूर्वी फिर्यादी यांचा भाऊ सचिन पासवान याला तंबाखु मागितले असता त्याने तंबाखु दिली नाही. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरुन आरोपींनी बुधवारी रात्री संगनमत करुन फिर्यादी यांना तुला आता मारुन टाकतो असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच संकेत थोरात याने तुला आता खल्लास करतो असे म्हणत त्याच्याकडील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात व हातावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. पुढील तपापस पोलीस करीत आहेत.

Hadapsar Pune Crime News | पुणे : तरुणीला अश्लील शिवागाळ करुन मारहाण, आरोपीला अटक

Related Posts