IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गुन्हे शाखेकडून तडीपार गुन्हेगारासह दोघांना अटक; पिस्टल, तलवार जप्त

by sachinsitapure
arrest

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) वेगवेगळ्या पथकांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तडीपार गुन्हेगारासह दोघांना अटक करुन एक पिस्टल आणि एक लोखंडी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी रावेत (Ravet Police Station) आणि पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने रावेत येथील रॉयल मराठा हॉटेल (Royal Maratha Hotel) जवळ सापळा रचून आनंद उर्फ दाद्या राजु गवळी (वय-21 रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आढळले. पोलिसांनी पिस्टल जप्त करुन आरोपीवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक मयुर दळवी यांनी फिर्याद दिली आहे.

दुसरी कारवाई खंडणी विरोधी पथकाने पिंपरी भाजीमंडई जवळ मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास केली. पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले असताना आदेशाचे उल्लंघन करुन शहरात फिरणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त केली आहे. शक्ती रामरतन बहोत (वय-37 रा. पिंपरी पुलाजवळ, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक शैलेश गुलाब मगर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

Related Posts