IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : नामांकित कंपन्यांचे बनावट कपडे विकणाऱ्या तिघांवर FIR

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरुन बनावट कपड्यांची वक्री प्रकरणी पिंपरी कॅम्प मधील तीन दुकानदारांवर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.2) दुपारी साडेतीन ते सायंकाळी पावणे सात या वेळेत करण्यात आली. या कारवाईत अकशा ड्रेसर्स, प्रगती ड्रेसर्स, एवन ड्रेसर्स या तीन दुकानातून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अफसर अली नसरुद्दीन शेख (वय 33, रा. सुभाषनगर, रिव्हर रोड, पिंपरी), आकाश राजेश जेवरानी (वय 32, रा. वैभवनगर, पिंपरी), माजीद अहमद शेख (वय 35, रा. सहकार कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र सोहन सिंग (वय-36 रा. कसबा पेठ, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आर.एन.ए. आय.पी एटोरनीज, हरियाणा या कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीला पुमा या कंपनीचे अधिकृत कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त आहेत. दरम्यान, पिंपरी कॅम्प येथे काही दुकानांमध्ये पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरुन कपडे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. फिर्य़ादी यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी कॅम्प परिसरातील दुकानात जाऊन पाहणी केली असता बनावट कपड्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले.

आरोपींनी त्यांच्या दुकानात फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेल्या पुमा कंपनीचे बनावट टी शर्ट, शॉर्ट पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट विक्री करताना व विक्रीसाठी ठेवल्या असताना आरोपी मिळून आले. या कारवाईत पोलिसांनी 12 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे रुपाली बोबडे करीत आहेत.

 

Related Posts