IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: फ्लॅटच्या बाहेर बुटात चावी ठेवणे पडले महागात, सांगवीत चोरट्यांनी घर साफ केलं

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅटच्याबाहेरील बुटात ठेवलेली चावी घेऊन अज्ञात चोरट्याने घरफोडी (House Burglary) करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Police Station) हद्दीत घडला आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) दुपारी पावणे दोनच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरातील भाऊनगर (Bhau Nagar Pimple Gurav) येथे घडली आहे.

याप्रकरणी अमोल अरुण जाधव (वय-41 रा. निळकंठ कृपा, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात आयपीसी 380, 454 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपळे गुरव परिसरातील निळकंठ कृपा या बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर राहतात. मंगळवारी फिर्यादी हे फ्लॅट बंद करुन बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांनी फ्लॅटची चावी फ्लॅटच्या बाहेरील बुटात ठेवली होती. याच चावीने अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप उघडले. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातील 64 ग्रॅम सोन्याचे दागिने व 23 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 10 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिखरे करीत आहेत.

सोनसाखळी चोर गजाआड

वाकड : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे 27 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) अटक केली आहे. तेजस उर्फ भैय्या नितीन वायदंडे (वय-21 रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबबत थेरगाव येथे राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडे सहा ते पावणे सात या दरम्यान पडवळनगर, थेरगाव येथे घडला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts