IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: मेहुणी आणि साडुच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

by sachinsitapure

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पती-पत्नीच्या किरकोळ गोष्टींमध्ये सतत ढवळाढवळ करुन साडू आणि मेहुणीने मानसिक त्रास दिला. दोघांच्या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास (Suicide Case) घेऊन आत्महत्या केली. ही घटना 16 जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील राजीव गांधी नगर येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तानाजी सुबराव ठोसर (वय-38 रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव मुळ रा. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी यांची आई नंदा सुबराव ठोसर (वय-55 रा. कुंबेफळ ता. परांडा जि. धाराशिव) यांनी शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मेहुणी दिपाली बाबासाहेब हावळे (वय-39) साडु बाबासाहेब प्रभु हावळे (वय-42 दोघे रा. दत्तमंदीर रोड, प्रभात कॉलनी, वाकड) यांच्यावर आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब हा फिर्यादी यांच्या मुलाचा साडू आहे. तानाजी आणि त्यांच्या पत्नीचे किरकोळ कारणावरुन सतत भांडण होत होते. त्या कारणावरुन बाळासाहेब आणि त्याच्या पत्नीने तानाजी यांच्या संसारात सतत ढवळाढवळ केली. तसेच तानाजी यांना मानसिक त्रास देऊन मारहाण केली. आरोपींच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचा मुलगा तानाजी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts