IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: ऑनलाईन जॉब पडला महागात! विश्वास संपादन करुन घातला गंडा

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | युवकाचा विश्वास संपादन करुन ऑनलाईन जॉब केल्यास आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवले (Lure Of Money). त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार 30 नोव्हेंबर 2022 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत Facebook व WhatsApp वर घडला आहे. याप्रकरणी युवकाने तळेगाव दाभाडे पोलिसांकडे (Talegaon Dabhade Police) फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी तळेगाव येथील विद्याविहार कॉलनीत राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीने सोमवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जॉसलीन नावाच्या अज्ञात व्यक्ती विरोधात आयपसी 420, 419 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगाराने फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला. जाहिरातीद्वारे ऑनलाईन जॉब संदर्भात माहिती दिली. ऑनलाईन जॉब केल्यास अधिकचा आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांची दोन लाख 2 हजार 451 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत वारे करीत आहेत.

Related Posts