IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: पोटनिवडणुकीतील वाद चिघळला! सराईत गुन्हेगाराचा खुन; भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ पोलिसांच्या ताब्यात

by sachinsitapure

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात सात आठ जणांनी एका गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार केले होते (Attack On Criminal). ही घटना सोमवारी (दि.1) रात्री दहाच्या सुमारास रावेत (Ravet) परिसरात घडली होती. जखमी झालेल्या गुन्हेगाराला उपचारासाठी थेरगाव (Hospital In Thergaon) येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (वय-34 रा. पुनावळे गावठाण) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवकर शेखर ओव्हाळ (Shekhar Ovhal) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत मयत अमोल सोबत असलेला सहकारी जखमी झाला आहे.

या प्रकरणी शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक ओव्हाळ, समीर शेख, महेश कदम, गणेश कदम आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या वादाचा राग मनात ठेवून अमोलचा खून करण्यात आला आहे. (Ravet Murder ase)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या मागील बाजूस बेसावध असलेल्या गोरगले याच्यावर सात ते आठ जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला.यामध्ये गंभीर झालेल्या अमोल याला तातडीने थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या खून प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांचा देखील सहभाग असल्याचे समोर आलं आहे. त्यांना रावेत पोलिसांनी (Ravet Police Station) ताब्यात घेतले आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अमोल गोरगले आणि शेखर ओव्हाळ यांच्यात वाद झाले होते. यावरून अमोलचा खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ओव्हाळ हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमोल गोरगले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक केली होती. तीन महिन्यापूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होती. पिंपरी चिंचवड पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Posts