IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | धक्कादायक! सेक्सटॉर्शनमुळे तरुणाने स्वतःचे जीवन संपवले

by sachinsitapure

पुणे: Pune Pimpri Chinchwad Crime News | सोशल मिडियावर न्यूड फोटो किंवा व्हिडीओ (Nude Photos & Videos) व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याच्या घटनांचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. नुकतेच दिघी येथील एका तरुणाने बदनामीच्या भीतीने स्वतःचे जीवन संपवल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तरुणाच्या भावाने २१ मे रोजी दिघी पोलिस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरजकुमार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यासह सहा मोबाईलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या भावाला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर त्यांचा फोटो अश्लील पद्धतीने ‘मॉर्फ’ केला. दरम्यान, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे ५१ लाख रुपयांची मागणी केली. (Sextortion Case)

बदनामी होऊ नये, यासाठी फिर्यादी यांच्या भावाने आरोपींना दहा हजार रुपये ऑनलाईन पाठवले; मात्र त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला वारंवार फोन करून मानसिक त्रास दिला.

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तसेच बदनामीच्या भीतीने फिर्यादी यांच्या भावाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने स्वः तचे जीवन संपवले, असे फिर्यादीत नमूद आहे. याबाबतचा अधिक तपास दिघी पोलिस करत आहेत.

सेक्सटॉर्शन कसं होतं?

“व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो. त्या अकाऊंटला सुंदर मुलीचा फोटो असतो. Hi, how are you असं म्हणून बोलणं सुरू केलं जातं. मग चॅटिंग सुरू झालं की तिकडून मागणी केली जाते की आपण व्हीडिओ कॉलवर बोलूया. व्हीडिओ कॉल सुरू झाला की, ती समोरची व्यक्ती न्यूड होते आणि आपल्यालाही प्रेशराईज केलं जातं की न्यूड व्हा. मग तुम्ही न्यूड झाला किंवा नाही झालात तरीही तुमचा चेहरा कॅप्चर होईपर्यंत तो व्हीडिओ सुरू राहतो. मग धमक्यांचे फोन यायला सुरुवात होते. आम्ही तक्रार करतो, व्हीडिओ व्हायरल करतो वगैरे वगैरे..त्यावेळी पैशांची मागणी केली जाते.

सेक्सटॉर्शन बाबत अनेकदा पोलीस विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते. कोणत्याही अमिषाला बळी न पडता सोशल मीडियावर योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे अशा प्रकारातून दिसून येतेय.

Related Posts