IMPIMP

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला मारहाण, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

by sachinsitapure

पुणे :  – Sahakar Nagar Pune Crime News | लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubts On Wife Character) घेऊन तिला वारंवार मारहाण करुन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. पतीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून विवाहितेने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या केली (Suicide Case). पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) धनकवडी येथे घडला आहे.

शिवानी दिपक दामगुडे (वय-24 रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती दिपक विठ्ठल दामगुडे (वय-30) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 115(2), 352, 351(2(3) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत शिवानीचे वडील काशिनाथ काळु राऊत (वय-50 रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (दि.3) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Sahakar Nagar Police Station)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मुलीचे 2019 मध्ये दिपक दामगुडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पतीने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने व कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तिला वारंवार शिवीगाळ करुन सोडून देण्याची धमकी दिली. पतीकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राऊत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हडपसरमध्ये विवाहितेची आत्महत्या

हडपसर : पती व सासु-सासरे यांच्याकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी सिद्धार्थ थोरात असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. ही घटना 1 जुलै रोजी हडपसर भागातील काळेपडळ (Kalepadal Hadapsar) येथील शिवराय कॉलनीत घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती सिद्धार्थ बिभीषण थोरात, सासु, सासरे बिभीषण थोरात (सर्व रा. शिवराय कॉलनी, काळेपडळ) यांच्यावर भान्यासं 108,35(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत शिवानी थोरात हिचे वडील सुनिल कामान्ना शिवपुजे (वय-53 रा. पाटस ता. दौंड) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts