IMPIMP

Vishrantwadi Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन मारहाण करणाऱ्या रोडरोमीयोला अटक

by sachinsitapure

पुणे :- Vishrantwadi Pune Crime News | क्लासला जाणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग केल्याचा जाब रोडरोमीयोला विचारला असता त्याने भररस्त्यात मुलीला माराहण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार विश्रांतवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Road Romeo Arrest)

याबाबत पिडीत मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सलमान शेख उर्फ बसर (वय-27 रा. राजीव गांधी नगर, लेन नं. 15, येरवडा) याच्यावर आयपीसी 354(ड), 323, 504 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची 16 वर्षाची मुलगी विश्रांतवाडी परिसरातील एका नामांकित कोचींग क्लासेस मध्ये शिकते. मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिचा वारंवार चोरून पाठलाग केला. हा प्रकार मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने आरोपीकडे याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला हाताने मारहाण करुन अश्लील शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अल्पवयीन मुलावर गुन्हा

पुणे : दहा वर्षाच्या मुलीला ‘आय लव यू’ म्हणून तिला पैशांचे आमिष दाखवून (Lure Of Money) तिचा पाठलाग केल्या प्रकरणी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी 17 वर्षाच्या मुलावर (सध्या रा. पुणे मुळ रा. पश्चिम बंगाल) याच्यावर आयपीसी 354(ड), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडला आहे (Molestation Case). फिर्यादी यांची मुलगी पार्कमध्ये खेळून बाहेर आली असता आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीजवळ जाऊन आय लव यू असे म्हटले. तसेच तिला पैशाचे आमिष दाखवून तिला अश्लील बोलून तिचा पाठलाग केला. हा प्रकार फिर्य़ादी यांना समजताच त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts