IMPIMP

Yerawada Pune Crime News | पुणे : बालसुधारगृहात राडा, डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी

by sachinsitapure

पुणे :  – Yerawada Pune Crime News | येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.30 जून) दुपारी एकच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बालसुधारगृहातील काळजीवाहू (केअरटेकर) महेश चंद्रकांत जाधव (वय 37 रा. वैदवाजी जवळ, गोपाळवाडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. येरवड्यात पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास बालसुधारगृहातील मुलांना जेवण देण्यासाठी टि.व्ही. च्या हॉलमधून बाहेर काढले.

सर्व मुलांचे जेवण झाल्यानंतर त्यांना निवासस्थानामध्ये ठेवण्यासाठी डेमोटरी प्रमाणे एका रांगेत उभे केले. त्यावेळी अल्पवयीन मुलाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात फरशी मारुन जखमी करुन शिवीगाळ केली. त्यावेळी बालसुधारगृहांतील कर्मचाऱ्यांनी फरशी मारणाऱ्या मुलाला पकडले. बालसुधारगृहात झालेल्या वादातून मुलाला मारहाण करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बचत गटाचे पैसे मागितल्याने अंगावर सोडले श्वान

पुणे : बचत गटाच्या थकीत पैशांची मागणी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली आहे. श्वानाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याबाबत एका 40 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्योती रघुनाथ शिर्के (वय 42) आणि तिचा पुतण्या मिहीर शिर्के (वय 25, दोघे रा. गांधीनगर येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (30 जून) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडला.

Related Posts