IMPIMP

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

by omkar
Covisheild- 'सीरम'ने मागितली कारवाईतून सूट, नियम एकच '

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – कोविशील्ड (Covisheild) व्हॅक्सीन ची मॅन्यूफॅक्चरर कंपनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ( serum institute ) ने सुद्धा सरकारकडून नुकसान भरपाईच्या जबाबदारीतून सूट देण्याची मागणी केली आहे.

सीरमच्या सूत्रांनी गुरुवार म्हटले की, केवळ सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (serum institute ) च नव्हे, जर परदेशी कंपन्यांना सुद्धा याची परवानगी दिली जाते तर सर्व व्हॅक्सीन कंपन्यांना नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर सूट दिली पाहिजे. (Covisheild)

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी संकेत दिला आहे की, सरकार भारतात लसींसाठी मंजूरीत वेग आणण्यासाठी फायजर आणि मॉडर्नाला नुकसान भरपाईच्या जबाबदारीत सूट देऊ शकते. सरकारच्या एका प्रमुख अधिकार्‍याने बुधवारी म्हटले होते की, भारतात फायजर आणि माडर्नाला नुकसान भरपाई देण्यात काहीच समस्या नाही.

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

डीसीजीआयने केली सवलतीची घोषणा

यापूर्वी बुधवारी भारताचे प्रमुख औषध नियामकाने केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली द्वारे परदेशात निर्मित कोविड-19 रोधी लसीची चाचणी करणे आणि अशा कंपन्यांसाठी लसींचा वापर सुरूझाल्यानंतर ब्रिजिंग ट्रायल करण्याच्या अनिवार्यतामध्ये सूट दिली आहे. ज्यामुळे लसीची उपलब्धता वाढेल. भारताच्या औषध महानियंत्रकांचा हा निर्णय फायजर तसेच सिप्ला सारख्या कंपन्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आला आहे.

त्यांनी भारताकडे आयात लसीच्या पुरवठ्यासाठी केलेल्या चर्चेच्या दरम्यान ही मागणी केली होती. अजूनपर्यंत कोणत्याही परदेशी कंपनीला भारतात कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस सुरू करण्यापूर्वी ब्रिजिंग ट्रायल करावी लागत होती.

यामध्ये मर्यादित संख्येत स्थानिक स्वयंसेवकांवर लसीचा प्रभाव आणि सुरक्षा तपासली जाते. डीसीजीआयनुसार, भारतात अलिकडेच कोविड-19 ची प्रकरणे प्रचंड वाढल्याने लसीची मागणी तसेच देशाची गरज पूर्ण करण्यासाठी आयात लसींची उपलब्धता वाढवण्याची आवश्यकता पाहता ही सूट दिली आहे.

त्यांनी म्हटले, आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींना मान्यता देण्याचा निर्णय घेतला जातो.

अशा लसींना मंजूरी दिली जाते ज्या अमेरिकन एफडीए, ईएमए, यूके एमएचआरए, पीएमडीए जपान द्वारे मान्यप्ताराप्त आहे.

किंवा डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या यादीत सुचीबद्ध आहे आणि ज्यांचा वापर अगोदर लाखो लोकांवर करण्यात आलेला आहे.

सीडीएल, कसौली द्वारे लसीची चाचणी करणे आणि ब्रिजिंग ट्रायलमधून सूट दिली जाऊ शकते. (Covisheild)

Also Read:- 

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं (Affair)(Affair)(Affair)

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

 

Related Posts