IMPIMP

जाणून घ्या : अखेर का चांगले आहेत व्हॅक्सीनमुळं होणारे काही साईड इफेक्ट्स ?

by sikandershaikh
vaccine

नवी दिल्ली : संपूर्ण जगात व्हॅक्सीन (vaccine) अभियान सुरू आहे. अशावेळी काही व्हॅक्सीनचे साइड इफेक्ट्स सुद्धा दिसून येत आहेत. डोकेदुखी, घशात दुखणे, थकवा, मळमळणे, चक्कर येणे, सांधेदुखी आणि मांसपेशींमध्ये वेदना हे व्हॅक्सीनचे सामान्य साइड इफेक्ट्स आहेत.

हेल्थ एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीनच्या (vaccine) सामान्य साइड इफेक्ट्सने घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण ही लक्षणे संकेत देतात की, प्रत्यक्षात व्हॅक्सीन आपले काम करत आहे. मात्र, काही लोकांमध्ये तिचे गंभीर साइड इफेक्ट्स सुद्धा दिसून येत आहेत परंतु अशी प्रकरणे खुप कमी आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

डिसेंबरमध्ये इम्पेरियल कॉलेज लंडनद्वारे करण्यात आलेल्या एका स्टडीमध्ये आढळले आहे की, एक तृतीयांश लोक व्हॅक्सीनच्या सुरक्षेबाबत चिंतेत होते. ऑक्सफर्ड व्हॅक्सीन ग्रुपने आपल्या वेबसाइटवर लिहिले की, ही लक्षणे दिसण्याचा प्रत्यक्ष अर्थ आहे की, तुमची इम्यून सिस्टम अगदी तशीच काम करत आहे जसे तिने केले पाहिजे.

कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन (vaccine) जेव्हा दिली जाते तेव्हा ती ताबडतोब व्हायरसविरूद्ध इम्यून सिस्टमला संदेश देण्यास सुरू करते. इम्यून सिस्टम पेशींचे, ऊतींचे आणि अवयवांचे एक गुंतागुंतीचे नेटवर्क आहे. हानिकारक बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या संसर्गाशी लढण्यासाठी हे सर्व एकाचवेळी मिळून काम करतात.

इम्यून सिस्टम व्हायरसशी लढण्यासाठी एक अँटीबॉडी बनवते. ही अँटीबॉडी रक्तप्रवाहाला नियंत्रित करते आणि टी-पेशींद्वारे असे व्हायरस ओळखते ज्यांना नष्ट करता येईल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

मात्र, इम्यून सिस्टम हे काम तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत तिच्या मेमरी सेलला हे आठवत नसेल की तिने अगोदर कधी कोविड-19 सारख्या शक्तीशाली व्हायरसचा सामना केला आहे का. व्हॅक्सीनची भूमिका येथेच येते.

व्हॅक्सीन इम्यून सिस्टमला व्हायरसचे छोटे, निष्क्रिय तुकडे किंवा याच्या जेनेटिक मटेरियलची ओळख करून देते.
यानंतर इम्यून सिस्टम प्रतिक्रिया देत शरीरात अँटीबॉडी आणि टी-पेशी बनवते.
अशाप्रकारे व्हायरसशी लढण्यासाठी शरीर पूर्णपणे तयार होते.
यामध्ये सायटोकिन्सची सुद्धा भूमिका महत्वाची आहे.

सायटोकिन्स टी पेशींना संदेश पाठवण्याचे काम करतात.
जेव्हा शरीरात एखाद्या प्रकारचे इन्फेक्शन होते तेव्हा सायटोकिन्स अ‍ॅक्टिव्ह होतात.
व्हॅक्सीन (vaccine) दिल्यानंतर सायटोकिन्सची मात्रा वाढते, जी इम्यून सिस्टमसाठी आवश्यक मानली जाते.
व्हॅक्सीन दिल्यानंतर फ्लू सारखी लक्षणे दिसल्यानंतर हे शरीरात वेगाने काम करते, ज्यामुळे रूग्ण कधी-कधी जास्त आजारी होऊ शकतो.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, अशाप्रकारचा त्रास होणे हे सिद्ध करते की, शरीराच्या प्रतिकारशक्तीने
व्हॅक्सीनसाठी (vaccine) प्रतिक्रिया दिली आहे आणि ती इम्यून सिस्टमला व्हायरसवर हल्ला करण्यासाठी तयार करत आहे.

मात्र, याचा अर्थ हा नाही की, ज्या लोकांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत त्यांच्यावर व्हॅक्सीन कमी परिणाम करत आहे.
प्रत्येक व्यक्तीची इम्यून सिस्टम वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देते.

इंग्लंडच्या रिडिंग युनिव्हर्सिटीच्या बायोमेडिकल टेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट डॉक्टर अलेक्झेंडर एडवर्ड्स यांनी डेली मेलला सांगितले की,
स्वत:ला चांगले न वाटणे आणि व्हॅक्सीनप्रती (vaccine) इम्यून रिस्पॉन्सच्या दरम्यान एक प्रत्यक्ष संबंध
आहे परंतु याबाबत तुम्ही ठोस काही सांगू शकत नाही.
कारण सर्वांची इम्यून सिस्टम वेगवेळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देते.
याचा अर्थ असाही होतो की, व्हॅक्सीनचा कोणताही इफेक्ट जाणवला नाही तरी सुद्धा ती चांगला परिणाम करू शकते.

तुम्हाला देखील रात्री उशिरा खाण्याची आहे सवय तर आजच बंद करा, अन्यथा आरोग्याचे होतील ‘हे’ 4 मोठे नुकसान

Related Posts