IMPIMP

24×7 Water Supply – Pune PMC | समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा – चंद्रकांत पाटील

by nagesh
 24x7 Water Supply - Pune PMC | Complete the work of Samana Water Supply Scheme at speed - Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – 24×7 Water Supply – Pune PMC | पुण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणेकरांच्या किमान गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत,असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले. (24×7 Water Supply – Pune PMC)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी येथील २४x७ समान पाणीपुरवठा योजना (24×7 Water Supply – Pune PMC) व सुस, म्हाळुंगे येथील नवीन पाणीपुरवठ्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सफा बँक्वेट बाणेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar Pmc) , २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Superintending Engineer Nandkishore Jagtap) , पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी (Superintending Engineer Prasanna Joshi), उपअभियंता विनोद क्षीरसागर (Deputy Engineer Vinod Kshirsagar), माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar), नगरसेविका ज्योती कळमकर (Jyoti Kalamkar), स्वप्नाली सायकर (Swapnali Saikar) आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री पाटील म्हणाले की, पुणे शहर हे राहण्यासाठी सर्वोत्तम शहर ठरत असल्याने लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. नागरिकांच्या किमान गरजांना प्राधान्य क्रम राहिला पाहिजे.
त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत.
तसेच पाणीगळती (Pune Water Leak) रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

पालकमंत्र्यांनी बाणेर-बालेवाडी (Baner Balewadi) पाणी पुरवठा जलवाहिनी आणि पंपिंगच्या कामाची माहिती घेतली.
त्यांनी पाणी साठवण टाकीच्या कामाचीही पाहणी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

सध्या बदलत्या वातावरणामुळे उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे.
आगामी काळात सर्वांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.
नागरिकांनी पिण्याचे पाणी गाडी धुणे, बांधकाम यांसारख्या तत्सम कामांसाठी वापरणे कटाक्षाने टाळावे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

Web Title :-  24×7 Water Supply – Pune PMC | Complete the work of Samana Water Supply Scheme at speed – Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Buldhana Crime News | गुंगीचं औषध देऊन 50 वर्षीय नराधमाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

CM Eknath Shinde | पंकजा मुंडेंची मागणी अन् मुख्यमंत्र्यांची घोषणा, उपस्थितांचा जल्लोष; पंकजा मुंडेंनीही वाजवल्या टाळ्या (व्हिडिओ)

Bhagini Nivedita Bank | भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा 22 मार्च रोजी सुवर्णमहोत्सवी वर्ष प्रारंभ

 

Related Posts