IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात 3 % होऊ शकते वाढ

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission latest news da of central employees may soon increase by three percent benefit up to rs 90000 annually

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (central government employees) नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते. पुन्हा एकदा केंद्र सरकार महागाई भत्त्यात (DA) वाढ करू शकते. अलिकडेच सरकारने 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ केली होती. ज्यानंतर 28 टक्केवरून 31 टक्के करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ जुलै 2021 पासून लागू होईल, जो नवीन वर्षात कॅलक्युलेट केला जाईल. यासोबतच डीआर, टीए आणि एचआरएमध्ये झालेल्या अलिकडील वाढीचे पैसे सुद्धा नवीन वर्षात दिले जाऊ शकतात. यामुळे केंद्री कर्मचार्‍यांच्या सॅलरीत मोठी वाढ होऊ शकते. (7th Pay Commission)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किती होऊ शकते सॅलरीत वाढ
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होऊ शकते. जर ही वाढ झाली तर महागाई भत्ता आता 34 टक्केच्या कॅलक्युलेशनने मिळेल. ज्यामुळे कर्मचार्‍यांच्या सॅलरीत सुद्धा मोठी वाढ होईल.

 

तसेच सॅलरी सुमारे 20,000 च्या वाढीसह येऊ शकते. मात्र, महागाई भत्त्यात वाढीबाबत सरकारकडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

दोन वेळा DA मध्ये झाली आहे वाढ
केंद्रीय कर्मचार्‍यांना आता 31 टक्केच्या हिशेबाने डीए मिळत आहे. जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. जुलैमध्ये अगोदर 28 टक्के वाढ करण्यात आली आणि नंतर तीन टक्के वाढवून तो 31 टक्के करण्यात आला. (7th Pay Commission)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते सरकार
महागाई भत्त्यात वाढीशिवाय केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार केला जात आहे.
2016 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता.
त्यावेळी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन थेट 6000 रुपयांनी वाढवून 18,000 रुपये करण्यात आले होते.
याच्या वाढीमुळे किमान वेतनात वाढ होऊ शकते.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission good news for central employees dearness allowance may increase by 3 percent on new year 2022

 

हे देखील वाचा :

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड

Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल

Pune Crime | पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

 

Related Posts