IMPIMP

ACB Trap On Excise Inspector | बीअर बारच्या परवान्यासाठी घेतली 3.25 लाखांची लाच, उत्पादन शुल्कचा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

by sachinsitapure

नागपुर :  – ACB Trap On Excise Inspector | नवीन बीअर बारच्या परवान्यासाठी सव्वातीन लाखांची लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग ई विभाग नागपूरच्या निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले (Nagpur ACB). रवींद्र लक्ष्मण कोकरे Ravindra Laxman Kokre (वय ४९) असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे (Excise Department Nagpur) . याप्रकरणात बडे मासे अडकण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत फ्रेण्ड्स कॉलनीत राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाने नागपूर एसीबी कार्य़ालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे कळमेश्वर परिसरात रेस्टॉरेंट आहे. त्यांना त्याठिकाणी बीअरबारचा परवाना हवा होता. यासाठी तक्रारदार यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला. पडताळणी करुन परवान्याची फाइल अधीक्षकांकडे पाठवण्यासाठी रवींद्र कोकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 4 लाखांची मागणी केली. तडजोडी अंती तीन लाख 25 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्याकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता निरीक्षक रवींद्र कोकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे चार लाखांची मागणी करुन सव्वातीन लाख रुपये स्वीकारण्याची संमती दिली. त्यानुसार पथकाने धरमपेठेतील चिल्ड्रेन ट्राफिक पार्क परिसरात गुरुवारी रात्री सापळा रचला. कोकरे यांनी लाच घेताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नागपूर एसीबीचे अधीक्षक राहुल माकणीकर, अपर अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लाकडे, पोलीस अंमलदार सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम, विकास सायरे, राजू जांभूळकर यांच्या पथकाने केली.

Prithviraj Chavan On Prakash Ambedkar | लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला, त्यांना एक टक्काही मतं मिळणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण

Related Posts