IMPIMP

Aaryans Group Of Companies | आर्यन्स ग्रुपच्या वतीने मराठी कलाकारांसाठी सन्मान सोहळ्याची घोषणा; मंत्री दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती

by nagesh
Aaryans Group of Companies | Announcement of Marathi artistes felicitation ceremony on behalf of Aryans Group; Special presence of Minister Deepak Kesarkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज (Aaryans Group of Companies) नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असतं. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान म्हणून यावर्षी ग्रुपकडून ‘आर्यन्स सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट व नाटक क्षेत्रातील दर्जेदार कलावंतांचा कौतुक सोहळा या निमित्ताने दरवर्षी आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची विशेष उपस्थिती लाभली. (Aaryans Group of Companies)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यामधून आर्यन्स ग्रुप लवकरच मराठी वृत्तवाहिनी, मनोरंजन वाहिनी, क्रीडा वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मीडिया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. माहिती व मनोरंजन विश्वातील त्यांचे पहिले पाऊल हे सर्व मराठी रसिकजनांसाठी आनंदाचा क्षण ठरावे म्हणून नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मात्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी या वर्षापासून पुण्यात आर्यन्स सन्मान सोहळा’ सुरू करीत आहेत. (Aaryans Group of Companies)

 

या निमित्ताने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली. पुरस्काराविषयी बोलताना केसरकर म्हणाले की, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजकडून हा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून अनेक कलावंतांना प्रोत्साहन मिळेल. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज नवीन मराठी वहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व पुण्यातच होणार आहे. पुणे जसं विद्येचे माहेरघर आहे तसंच कलेचं देखील माहेरघर आहे. त्यामुळे कलाकारांना आणखीन संधी उपलब्ध होणार आहे. अशा उपक्रमामुळे कला आणि भाषा यांचा विकास होण्यास मदतच होते.

 

या सन्मान सोहळयात गेल्या वर्षभरात सेन्सॉर आणि प्रदर्शित झालेले चित्रपट आणि नाटकातून सर्वोतम असलेल्यांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपात पुरस्कार देण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने सर्वोत्तम चित्रपट आणि नाटकाचा महोत्सव ही पुण्यात घेण्यात येईल. १ जून २०२२ ते ३१ मे २०२३ या दरम्यान प्रदर्शित किवा सेन्सॉर झालेले चित्रपट यासाठी अर्ज करू शकतात. तसेच याच कालावधीत प्रदर्शित झालेली नाटके सुद्धा अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज २० मे २०२३ पर्यंत स्वीकारले जातील. त्रिस्तरीय निवड पद्धतीतून नामांकने निवडण्यात येतील. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने सर्वोत्तम ७ चित्रपट आणि नाटकाचा महोत्सव ही पुण्यात जून अखेरीस घेण्यात येईल. त्या महोत्सवात आलेल्या प्रश्नांची मते ही नामांकनासाठी विचारात घेतली जातील. या पुरस्कार सोहळ्यासाठीचे प्रवेश अर्ज हे aaryanssnmana.com या वेब साईट वर मिळतील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाटक पुरस्कार

-सर्वोत्कृष्ट नाटक :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट लेखक :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट पुरष कलाकार :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट नेपथ्य :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट संगीत :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना :- रोखरक्कम २५ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

 

चित्रपट पुरस्कार

-सर्वोत्कृष्ट चित्रपट :- रोखरक्कम १ लाख आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट कथा :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट पटकथा / संवाद :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट छायाचित्रण .:- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट संगीत :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट गायक :- रोेखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट गायिका :- रोखरकम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट गीतकार :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक: रोखरक्तम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

-सर्वोत्कृष्ट संकलक :- रोखरक्कम ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह

समीक्षक सर्वोत्तम चित्रपट :- रोखरक्कम १ लाख आणि स्मृतीचिन्ह

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Aaryans Group of Companies | Announcement of Marathi artistes felicitation ceremony on behalf of Aryans Group; Special presence of Minister Deepak Kesarkar

 

हे देखील वाचा :

Pune Lady Doctors Fashion Show | महिला डॉक्टरांच्या चॅरिटी फॅशन शो मधून दुर्गम भागातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स व मुलींना एचपीव्ही लसीकरण मोफत (Video)

Uday Samant | मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी गेले? तर्कवितर्कांवर उदय सामंत म्हणाले…

Mula Mutha River Rejuvenation Project | मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुनी व दुर्मिळ वृक्षांचा समावेश नाही; समाज माध्यमांवर फिरत आहे चुकीची आकडेवारी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

 

Related Posts