IMPIMP

ACB File FIR On Dilip Mahadev Nazirkar | बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी पशु वैद्यकीय विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

by sachinsitapure

सातारा :  – ACB File FIR On Dilip Mahadev Nazirkar | फलटण तालुक्यातील बरड पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 15 लाख 84 हजार रुपयांची अपसंपदा जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप महादेव नाझीरकर (वय-55 रा. बारामती जि. पुणे) असं संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडे 25.7 टक्के जास्त मालमत्ता आढळून आली. दिलीप नाझीरकर हे पशुसंवर्धन वैद्यकिय दवाखान्यात सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी ही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं म्हणणं आहे. (Satara ACB)

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन राउत यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत सातारा एसीबीचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दिलीप नाझीरकर यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत सातारा एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. चौकशीमध्ये नाझीरकर यांनी 2011 ते 2019 या कालावधीत आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन 15 लाख 84 हजार 171 रुपये किंमतीची अपसंपदा गैरमार्गाने संपादीत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सरकार तर्फे फिर्याद देऊन नाझीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश राऊत करीत आहेत.

Related Posts