IMPIMP

Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी ग्रुपचा मोठा निर्णय ! एनडीटीव्ही सुरू करणार विविध भारतीय भाषांमध्ये 9 न्यूज चॅनेल

by nagesh
Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | Big decision of Adani Group! NDTV to launch 9 news channels in various Indian languages

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | अदानी समुहाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता एनडीटीव्ही विविध भारतीय भाषांमध्ये तब्बल 9 न्यूज चॅनेल सुरू करणार आहे. दि. 17 मे 2023 रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेणयात आला असून यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची परवानगी घेण्याच्या प्रस्तावास संचालक मंडळानं मान्यता दिली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry Of Information And Broadcasting) मंजुरीनंतर चॅनेल सुरू
करण्याची तारीख स्टॉक एक्सचेंजला (Stock Exchange) सांगितली जाणार आहे. AMG Media Networks ने दि.
30 डिसेंबर 2022 रोजी राधिका रॉय (Radhika Roy) आणि प्रणव रॉय (Prannoy Roy) यांच्याकडून NDTV मधील
27.26 टक्के भागभांडवल (शेअरर्स) एका उपकंपनीव्दारे विकत घेतले होते.
त्यामुळे एएमजी मिडीयाचा एनडीटीव्हीमधील एकूण वाटा वाढून तो 64.71 टक्के इतका झालेला आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हिंडनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) अदानी ग्रुपवर मोठया प्रमाणावर स्टॉकच्या किंमतीत फेरफार
केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर एनडीटीव्ही च्या शेअरच्या किंमतीमध्ये सुमारे 39 टक्क्यांनी घसरण
झाली होती. आता एनडीटीव्ही 9 प्रादेशिक भाषांमध्ये न्यूज चॅनेल सुरू असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title : Adani Group’s NDTV To Launch 9 Regional News Channels | Big decision of Adani Group! NDTV to launch 9 news channels in various Indian languages

Related Posts