IMPIMP

Ajit Pawar | ‘तुम्ही आयुष्यभर जमिनी लाटल्या’, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन अजित पवारांचा पलटवार; म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reply chandrakant patil on his criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | ”अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं.” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. दरम्यान या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पलटवार केला आहे. ”मी मंत्रालयात सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरापर्यंत बसून काम करणारा मंत्री आहे. हे सर्व जनता जाणते, त्यामुळे चंद्रकांतदादांनी बेजबाबदार व बिनबुडाची वक्तव्ये करु नयेत,” अशा सडेतोड शब्दात प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार बोलताना म्हणाले, की ”मी मंत्रालयात सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरापर्यंत बसून काम करणारा मंत्री आहे. हे सर्व जनता जाणते, त्यामुळे चंद्रकांतदादांनी बेजबाबदार व बिनबुडाची वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कुठून कुठे जाणार याचीही माहिती द्यावी लागते. चंद्रकांत पाटील यांना ही वस्तूस्थिती माहीतीय. तरीही ते अशी वक्तव्य करत आहेत. याला मराठीत ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असं म्हणतात.” असं ते म्हणाले.

 

पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घ्यावे, हे जनतेने ठरवावे असा टोला देखील अजित पवार यांनी यावेळी लगावला आहे.. मी काम करणारा माणूस आहे. माझ्या परीने मला जेवढी शक्य होतील तेवढी जनतेची कामे मी निस्वार्थीपणे करत असतो. चंद्रकांतदादांनी बोलताना जरा भान ठेऊन बोलावं,” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, ”अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं.
अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, कुणाची जमिन शिल्लक आहे का ते पाहतात.
धरणाची जमिनही सोडत नाही,” असे गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reply chandrakant patil on his criticism

 

हे देखील वाचा :

Maha govt launches Suvidha Kendra | धारावीमध्ये देशातील सर्वात मोठे सुविधा केंद्र ! 50 हजार लोकांना एकाच वेळी आंघोळ करण्याची सुविधा

Pune Crime | बिबवेवाडीत युवकावर गोळीबार करुन जंगलात लपलेल्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 6 जणांना अटक

Multibagger Chemical Stock | 2 दिवसात 36% वाढला ‘हा’ शेयर, शंकर शर्मा यांच्या बल्क डीलने चमक वाढली का ?

 

Related Posts