IMPIMP

Ajit Pawar In Baramati Lok Sabha | खास शैलीत मतदारांना पटवण्याचा अजितदादांचा प्रयत्न, ”मी पुण्याच्या सभेत मोदी-शहांशी विकासाच्या गप्पा मारत होतो, त्यांना निधी पाहिजे सांगितले”

by sachinsitapure

बारामती : Ajit Pawar In Baramati Lok Sabha | बारामती लोकसभेची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने अजित पवार सर्व डाव अजमावत आहेत. प्रचाराचा त्यांनी धडका लावला आहे. सत्तेसोबत गेल्यावर विकास होतो, हे ते सातत्याने बारामतीकरांच्या मनावर ठसवत आहेत. मोदी-शहा निधी देतील, असे ते म्हणत आहेत. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे झालेल्या सभेतही त्यांनी मोदी-शहांशी माझी कशी जवळीक आहे, मी पुण्याच्या सभेत त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो, असे म्हणत पुन्हा एकदा मतदारांना विकासनिधी मी कसा आणू शकतो, हे पटवण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार म्हणाले, तुम्ही सातवेळा मला निवडून दिले, पाचवेळा मी उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे माझी अनेक लोकांशी ओळख झाली. तुम्ही बघितले असेल, मी पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे, हे मी त्यांना सांगितले.

अजित पवार म्हणाले, जे विरोधात आहेत, ते उसाला पाणी देतात पण त्यांना कळत नाही, हे पाणी महायुतीने आणले. नाहीतर इथे धुरळा झाला असता धुरळा. मी कामाचा माणूस आहे. हे चित्र मी बदलून दाखवीन. कोण कॅनॉलला पाणी देऊ शकेल, कोण समस्या सोडवू शकेल, याचा विचार करा. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. अजित पवारने सत्तेत राहून काय केले?, असा प्रश्न ते विचारतील. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भावनिक होऊन मतदान करु नका, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, वडीलधारी लोकांबाबत आदर आहे. ते जे सांगतील ते ४० वर्षे ऐकले. आता विकासासाठी हा निर्णय घेतला. कुणाला त्रास देण्याची भूमिका माझी नव्हती. तुमच्या विश्वासाला सुनेत्रा तडा जाऊ देणार नाही. मी कामाचा माणूस आहे, हे चित्र मी बदलून दाखवेन.

या सभेत महादेव जानकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आम्हाला राजकीय भागीदारी दिली का? इथून पुढे सत्तेत भागीदारी महत्त्वाची असेल. पुढील काळात महाराष्ट्रात धिंगाणा होईल. मोदींची माझी चांगली ओळख आहे. मी परभणीला निधी देणार, पण बारामतीत देखील निधी देणार. अजित पवार भाबडा माणूस आहे. उद्याचा विकासपुरुष अजितदादा आहेत.

सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना महादेव जानकर म्हणाले, बहिणीचे लग्न झाल्यावर तिने भावाच्या घरात राहायचे नसते, आपल्या घरी जावे. भाऊ म्हणून सोन्याची साडी घेऊ.

Related Posts