IMPIMP

Amul Franchise | अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी, छोटे दुकान आणि चांगले कमिशन, असा करा अर्ज, किती लागेल भांडवल

by sachinsitapure

नवी दिल्ली : देशात दूध विक्रीत अमूल एक मोठे नाव आहे. अमूल मिल्क प्रॉडक्ट सेल करण्यासाठी फ्रेंचायझी देत आहे. कंपनी तुमच्या नफ्यातून हिस्सा मागत नाही. तसेच अमूल कमिशनवर माल देते. अमूलची दोन प्रकारची फ्रेंचायझी मिळते (Business Idea Amul Franchise). यामध्ये अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर आणि अमूल कियॉस्क आहे. तसेच आणखी एक फ्रेंचायझी म्हणजे अमूल आयस्क्रीम स्कूपिंग पार्लर आहे.

अमूल आउटलेट घ्यायचे असेल तर तुमच्याकडे १५० वर्ग फूट जागा आवश्यक आहे. आयस्क्रीम पार्लरसाठी किमान ३०० वर्ग फूट जागा पाहिजे. या संबंधीची विस्तृत माहिती अमूलची ऑफिशियल वेबसाईट (https://amul.com/m/amul-franchise-business-opportunity#1) वर घेऊ शकता.

अमूल आऊटलेट, रेल्वे पार्लर आणि कियॉस्काचा खर्च
अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर आणि अमूल कियॉस्कची फ्रेंचायझी घेण्यासाठी २ लाख खर्च करावे लागतील. यामध्ये २५,००० ब्रँड सिक्युरिटी, रेनोव्हेशनसाठी १००००० आणि यंत्रांसाठी ७०,००० रुपयांचा समावेश आहे. या तिन्ही आऊटलेटसाठी दुकानाची जागा १००-१५० स्क्वेयर फूट पाहिजे.

अमूल आयस्क्रीम स्कुपिंग पार्लरचा खर्च
अमूल आयस्क्रीम स्कुपिंग पार्लर उघडण्याचा खर्च ६ लाख रुपये आहे. यामध्ये ५०,००० सिक्युरिटी डिपॉझिट, ४ लाख रिन्यूव्हेशन खर्च आणि दिड लाख रुपयांची मशिनरीसाठी द्यावे लागतील. अमूल आऊटलेटमधून तुम्ही महिना २ ते ३ लाख अथवा त्यापेक्षा जास्त कमावू शकता.

Related Posts