IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 4 हजाराची लाच घेताना पोलिस नाईक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Dhule | चार हजाराची लाच स्वीकारणारा पोलिस नाईक धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Dhule) जाळ्यात सापडला आहे. कापूस खरेदी प्रकरणात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मध्यस्थी केल्याच्या मोबदल्यात 4 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस नाईकास एसीबी पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी नरडाना पोलीस ठाण्यात (Nardana Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. शशिकांत कोळी (Shashikant Koli) असं लाच घेणाऱ्या पोलीस नाईकाचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील पंधरा वर्षापासून शिंदखेडा तालुक्यातील बेटावद परिसरात एक व्यापारी कापूस खरेदीचा व्यवसाय करत आहेत. या व्यापाऱ्याने या भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील कापूस खरेदी केला. परंतु, पैशाच्या कारणावरून नरडाना पोलीस ठाण्यात (Nardana Police Station) संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीत नरडाणा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक शशिकांत कोळी (Police Naik Shashikant Koli) यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र त्याच्या मोबदल्यात शशिकांत हे तक्रारदार यांच्याकडून पैशांची मागणी करु लागले.

 

 

यानंतर तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti Corruption Bureau (ACB) Dhule) तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून एसीबी पथकाने तक्रारीची खात्री केली. यानंतर पथकाने बेटावद गावाच्या प्रवेशद्वारा समोरील रस्त्यावर सापळा रचला.
यावेळी शशिकांत कोळी यांना 4 हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (DySP Anil Badgujar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण (Police Inspector Manjeet Singh Chavan), प्रकाश झोडगे (Prakash Zodage), राजन कदम (Rajan Kadam), प्रशांत चौधरी (Prashant Chaudhary), कृष्णकांत वाडीले (Prashant Chaudhary), महेश मोरे (Mahesh More), शरद काटके (Sharad Katke), कैलास जोहरे (Kailash Johre) यांनी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Dhule | Police Naik Shashikant Koli caught in anti-corruption trap while accepting bribe of Rs 4,000

 

हे देखील वाचा :

Cast India | कास्ट इंडिया : माध्यम क्षेत्रातील उद्योजक आणि सर्जनशील व्यावसायिक यांना एकत्र आणणारे स्टार्टअप व्यासपीठ

Pune NCP | बंडातात्या कराडकर यांच्या विधानाचा पुणे राष्ट्रवादीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करुन निषेध

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3374 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Tata Group चे ‘हे’ 2 शेयर करून देतील चांगला नफा! स्टॉक्समध्ये होऊ शकते 30% पर्यंत वाढ; राकेश झुनझुनवाला यांनही केलीय गुंतवणूक

 

Related Posts