IMPIMP

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3374 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचे (Pune Corona Update) दोन हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 2110 कोरोना बाधित रुग्णांचे (Pune Corona Update) निदान झाले आहे. तर 3374 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचवेळी 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9 हजार 118 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 2110 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 48 हजार 592 इतकी झाली आहे. याच दरम्यान 3374 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 6 लाख 18 हजार 560 रुग्ण बरे झाले आहेत.

 

शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. सध्या शहरामध्ये 20 हजार 752 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत केवळ 4.56 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
यामध्ये 263 रुग्ण ऑक्सिजनवर (Oxygen) उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 48 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive Ventilator) 22 रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 तर शहराबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील 9280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Corona Update | 3374 corona patients discharged in Pune city in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Tata Group चे ‘हे’ 2 शेयर करून देतील चांगला नफा! स्टॉक्समध्ये होऊ शकते 30% पर्यंत वाढ; राकेश झुनझुनवाला यांनही केलीय गुंतवणूक

Maharashtra Police | दुर्दैवी ! शारीरिक कसरती करताना 27 वर्षीय पोलिसाचा मृत्यू; इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावावर शोककळा

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त ! माधव वाघाटे खून प्रकरणातील सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

 

Related Posts