IMPIMP

Arjun Sachin Tendulkar | ‘…म्हणून मी अर्जुन तेंडुलकरचे सामने पाहायला जात नाही’; सचिन तेंडुलकरने केला मोठा खुलासा

by nagesh
Arjun Sachin Tendulkar | sachin tendulkar never watches his son arjun tendulkar play cricket matches know reason

सरकारसत्ता ऑनलाइन – क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकर शिवाय (Sachin Tendulkar) पुर्ण होत नाही. क्रिकेटच्या (Cricket) व्याख्येमध्ये सचिनचं नाव नसेल तर ती व्याख्याही अपुर्ण म्हणावी लागेल. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखलं जातं. सचिनने आपल्या कारकीर्दित अनेक विक्रम करून ठेवलेत जे अजुनही कोणाला त्याची बरोबरी करता आली नाही. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही (Arjun Sachin Tendulkar) क्रिकेट खेळतो मात्र अद्याप मोठ्या ठिकाणी त्याला संधी मिळाली नाही. सचिनने अर्जुनबाबत (Arjun Sachin Tendulkar) एक मोठा खुलासा केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सचिन हा आपल्या मुलाचे म्हणजे अर्जुनचे (Arjun Tendulkar) सामने पाहायला जात नाही. परंतु असं का?, सचिन आपल्याच मुलाचा सामना का पाहत नसावा?, यामागचं कारण सचिनने एका मुलाखतीत (Interview) बोलताना सांगितलं आहे.

 

मी अर्जुनचे (Arjun Sachin Tendulkar) क्रिकेटचे सामने कधीही पाहायला गेलो नाही. कारण जेव्हा आपलं मुलगा मैदानाता असतो तेव्हा त्याचं दडपण आई- वडिलांना किती असतं हे मी 24 वर्षे अनुभवलं आणि जवळूनही पाहिलं आहे. त्यामुळे मी त्याचे सामने कधीही पाहायला जात नसल्याचं सचिन म्हणाला. त्यासोबतच जर मला सामना पाहण्याचा मोह आवरला नाही तर मी लपून तो सामना पाहतो. त्याच्या कोचला (Coach) आणि त्यालाही याबाबत काही कल्पना देत नाही. माझ्या हजेरीमध्ये त्याच्यावर येणारं दडपण मला नकोय, असंही सचिनने सांगितलं.

अर्जुनने बिंधास्तपणे आपलं क्रिकेट खेळावं आणि क्रिकेटच्या प्रेमात पडावं. त्याच्या इच्छेनुसार त्याला जसं आवडेल त्या गोष्टी त्याने कराव्यात.
अर्जुन सुरूवातीला क्रिकेट खेळायचा त्यानंतर बुद्धीबळ खेळू लागला आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात (Life) क्रिकेट आल्याचं सचिनने सांगितलं.
यंदाच्या आयपीएलमधील (IPL) लिलावाच अर्जुनला मुंबई इंडिअन्स Mumbai Indians (MI) संघाने आपल्या ताफ्यात घेतलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सचिनच्या कसोटीमध्ये (Test) १५,९२१ धावा तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ धावा आहेत.
कसोटीमदध्ये ५१ शतके (Centuries) तर वनडे मध्ये ४९ शतकांची नोंद आहे.

 

 

Web Title :- Arjun Sachin Tendulkar | sachin tendulkar never watches his son arjun tendulkar play cricket matches know reason

 

हे देखील वाचा :

Varsha Gaikwad | राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून काम करूया – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Maharashtra New DGP | वरिष्ठ IPS अधिकारी रजनीश सेठ राज्याचे नवे पोलीस महासंचालक

PPF Investment | … तर PPF खात्यात गुंतवणुकीशिवाय होईल मोठी कमाई, जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला

Amol Kolhe | ‘बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस’; अमोल कोल्हेंना मायेची ‘तंबी’ (Video)

 

Related Posts