IMPIMP

Awareness About Leopard In Khed | जुन्नर: वनविभागाकडून खेड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याबद्दल जनजागृती

by sachinsitapure

जुन्नर : – Awareness About Leopard In Khed | जुन्नर वनविभागातील खेड तालुक्यातील अनेक भागात बिबट वन्य प्राण्याचा अधिवास आढळून आला आहे. मानव बिबट संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या वतीने खेड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट वन्यप्राण्याबाबत जनजागृती मोहिमेतून गावोगावी वाड्यावर जाऊन शेतकरी व नागरिकांनी सुरक्षित च्या दृष्टीने सतर्क राहण्याचे व खबरदारी घेण्याचे आव्हान वनविभागातर्फे करण्यात येत असल्याची माहिती चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली

बिबट्याचा मानवी वस्तीतील मुक्त वावर, शेतात काम करताना बिबट्याचे दिवसाढवळ्या होत असलेले दर्शन, पशुधनावर हल्ले होण्याच्या घटनेमध्ये होत असलेली वाढ यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाकडे उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

त्या दृष्टीने उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते सहाय्यक वं संरक्षक संदेश पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आळंदी सचिन जाधवर, वनरक्षक रेश्मा गायकवाड यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील मोजे धानोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मराठी शाळेमध्येपहिली ते सातवीतील लहान व मोठ्या मुलांना विबट बाबत जनजागृती केली तसेच उपस्थित शिक्षक यांनाही बिबट वन्य प्राण्यापासून घेण्याच्या काळजीबाबत व उपाय योजनेबाबत वनपाल आळंदी सचिन जाधवर तसेच वनरक्षक रेशमा गायकवाड यांनी माहिती सांगून मार्गदर्शन केले.

Related Posts